मराठी बातम्या /बातम्या /Viral /व्यक्तीने सहजच केली DNA टेस्ट, पण समोर आलं असं सत्य की धक्काच बसला

व्यक्तीने सहजच केली DNA टेस्ट, पण समोर आलं असं सत्य की धक्काच बसला

DNA टेस्टचा रिपोर्ट पाहून हादरला

DNA टेस्टचा रिपोर्ट पाहून हादरला

त्याने घरीच डीएनए चाचणी करून घेतली. त्याला त्याचे आई-वडील आणि भावंडांबद्दल जाणून घ्यायचं होतं, पण एक विचित्र वास्तव त्याच्यासमोर आलं

नवी दिल्ली 25 मे : आजकाल परदेशात डीएनए चाचणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. किटच्या सहज उपलब्धतेमुळे कोणीही आपल्या पूर्वजांबद्दल जाणून घेण्यासाठी ही चाचणी करत आहे. मात्र ही गोष्ट वेगळीच आहे, की एका टेस्टमुळे अनेकदा पूर्ण कुटुंबही उद्धवस्त होऊ शकतं. कधीकधी लोकांना डीएनए चाचणीद्वारे अशी काही रहस्ये समजतात की त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत.

मिररच्या रिपोर्टनुसार, ती व्यक्ती दत्तक घेतलेली होती. अशा परिस्थितीत त्याला आपल्या बायलॉजिकल कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचं होतं. अशा परिस्थितीत त्याने घरीच डीएनए चाचणी करून घेतली. त्याला त्याचे आई-वडील आणि भावंडांबद्दल जाणून घ्यायचं होतं, पण एक विचित्र वास्तव त्याच्यासमोर आलं. जे स्वीकारणं त्याला कठीण जात आहे.

बाथरूमच्या भिंतींतून बाहेर आली माणसाची बोटं अन्.., ते दृश्य पाहून हादरली तरुणी, थेट पोलीसच बोलावले

त्या व्यक्तीने Reddit वर आपली कहाणी सांगितली. त्याला 1999 मध्ये दत्तक घेण्यात आलं होतं आणि त्याला त्याच्या बायलॉजिकल कुटुंबाबद्दल काहीही माहिती नव्हतं. डीएनए चाचणीनंतर त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्याच्या आजीने 1970-80 च्या दशकात आजोबांना घटस्फोट दिला होता. त्याच्या आईचा जन्म त्याच्या आजोबांच्या पहिल्या पत्नीपासून झाला होता, तर त्याच्या आजोबांनी नंतर दुसरं लग्न केलं आणि आणखी 3 मुलांना जन्म दिला. आजोबांना आपल्या पत्नीबद्दल अजिबात माहिती नव्हती, की ती निष्पाप मुलांसोबत काय करते.

त्या व्यक्तीने पुढे सांगितलं की, तिला झोपेत तिच्याच मुलाचा वास घेत असे, पहिल्या मुलाचाही तिने असाच खून केला होता. 1990 च्या सुमारास तिचा गुन्हा उघडकीस आला आणि दोन्ही मुलांच्या हत्येप्रकरणी ती तुरुंगात गेली. तिने आपल्या पहिल्या मुलीलाही विजेचा धक्का देण्याचा प्रयत्न केला, पण ती वाचली. त्या व्यक्तीला कळालं, की त्याची सावत्र आजी अजूनही तुरुंगात आहे आणि तिच्यावर अनेक पुस्तकं आणि माहितीपट बनवले गेले आहेत. आता त्या व्यक्तीला असं वाटू लागलं आहे, की या महिलेचा त्याच्याशी थेट संबंध नाही हे चांगलं आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking news, Viral news