मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अचानक साप समोर दिसताच तरुणाची उडाली घाबरगुंडी; पळायला गेला, पण पाय घसरला अन्..., VIDEO

अचानक साप समोर दिसताच तरुणाची उडाली घाबरगुंडी; पळायला गेला, पण पाय घसरला अन्..., VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही लोक कामासाठी लोखंडाच्या पायाऱ्या चढून वरती येतात. इतक्यात यातील एका व्यक्तीची नजर शेजारीच असलेल्या सापावर जाते

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 05 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेक असे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात जे हैराण करणारे असतात. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र यातील सर्व व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरतातच असं नाही. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरतात, हे व्हिडिओ काही वेळातच व्हायरल होतात. सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत राहतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ (Shocking Snake Video) पाहून तुम्हीही हैराण व्हाल. साप तर अनेकांनी पाहिले असतील. साप समोर दिसताच कोणाचीही घाबरगुंडी उडते. साप इतके घातक असतात की सापाने चावा केल्यास अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात काहीही दुर्घटना घडलेली नाही. मात्र, सापाला पाहताच एका व्यक्तीची जी अवस्था झाली ती पाहण्यासारखी आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही लोक कामासाठी लोखंडाच्या पायाऱ्या चढून वरती येतात. इतक्यात यातील एका व्यक्तीची नजर शेजारीच असलेल्या सापावर जाते. साप समोर दिसताच त्याची अवस्था बिकट होते. लगेचच मागील बाजूला धावण्यासाठी तो प्रयत्न करू लागतो. मात्र, गडबडीत तो खाली कोसळतो. यानंतर त्याच्याच मागे असलेला दुसरा व्यक्ती त्याला उठवतो.
हैराण करणारी बाब म्हणजे या घाबरलेल्या व्यक्तीच्या पुढे असलेली व्यक्ती साप पाहूनच अतिशय आरामात तिथेच उभा आहे. असं वाटतं की या व्यक्तीला सापांची अजिबातही भीती वाटत नाही. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ discovery.engenharia नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 50 मिलियन म्हणजेच 5 कोटीहून अधिकांनी पाहिला आहे. 15 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. एका यूजरने यावर कमेंट करत म्हटलं की हे एकदम टॉम अॅण्ड जेरीप्रमाणे पळण्याचा प्रयत्न करत आहे.
First published:

Tags: Funny video, Snake video

पुढील बातम्या