वॉशिंग्टन, 06 मे : पार्क केलेल्या गाडी ज्यात कुणीच नाही अशी गाडी अचानक सुरू होणे, गाडीच्या लाइट्स अचानक पेटणे असे सीन तुम्ही बऱ्याच हॉरर मुव्हिमध्ये पाहिले असतील. अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. एका व्यक्तीने पार्क केलेल्या कारची लाइट रात्री अचानक पेटली. तो त्या कारच्या जवळ गेला आणि त्यावेळी त्याला जे दिसलं ते पाहून त्याला धक्काच बसला
(Parked car light on).
अमेरिकेतील नॉर्थवेस्ट कनेक्टिकटमध्ये राहणारा कोडी गिलोटी. ज्याच्या सासूने तिची कार (Mother-in-Law) पार्क केली होती. त्या घरातच होत्या. त्याचवेळी कोडीला त्यांच्या पार्क केलेल्या कारची लाइट रात्रीच्या वेळी अचानक ऑन झाल्याचं दिसलं. कारमध्ये काहीतरी विचित्र घडत असल्याची त्याला जाणीव झाली. म्हणून तो कारजवळ गेला तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्या कारमध्ये चक्क एक अस्वल होतं
(Bear in car).
हे वाचा - VIDEO - श्वानांसमोर शक्तिशाली बिबट्याचीही तंतरली; शिकार सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड
एशियानेट न्यूजच्या रिपोर्टनुसार एनबीसी न्यूजशी बोलताना कोडी गिलोटीने सांगितलं की, रात्री जेव्हा तो सोफ्यावर लोळत होता तेव्हा त्याला पार्किंगमध्ये (Parking) असलेल्या सासूच्या कारमधील लाईट्स ऑन दिसले. कारमध्ये एक अस्वल घुसलं होतं. हे अस्वल रात्री गुपचूप पार्टी करून आलेल्या आणि नंतर आईनं रंगेहाथ पकडलेल्या एखाद्या टीनएजरसारखं (Teenager) दिसत होतं. या अस्वलानं कारमध्ये जाण्यापूर्वी त्याच्या ट्रकचीही (Truck) तोडफोड केली होती. कदाचित खाण्याच्या (Food) शोधात ते अस्वल पार्किंमध्ये आलं होतं.
कोडी गिलोटीने कनेक्टिकट डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शनला (DEEP) कॉल केला. या संस्थेच्या लोकांनी दोरीनं कारचा दरवाजा उघडून आणि बीन बॅग गनमधून (Bean Bag Gun) एक राऊंड फायर करून अस्वलाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अस्वल पळून गेलं मात्र, तोपर्यंत कारचं भरपूर नुकसान झालं होतं. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. हे अस्वल लवकरच परत येऊ शकेल शक्यता गिलोटीने व्यक्त केली आहे.
हे वाचा - आई कांगारूप्रमाणे पेहराव करून आला व्यक्ती; बघताच पिल्लाने केलं हे काम, मन जिंकणारा VIDEO
HudFamous TV नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.