Home /News /viral /

प्रेयसीच्या बहिणीला बघताच तरुणाने विचारला एक प्रश्न; उत्तर मिळताच मोठ्या संकटात सापडला

प्रेयसीच्या बहिणीला बघताच तरुणाने विचारला एक प्रश्न; उत्तर मिळताच मोठ्या संकटात सापडला

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या तरुणाने गर्लफ्रेंडच्या बहिणीबद्दल विचारताच सर्वांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. आधी बहिणीनं सांगितलं की ती अभिनेत्री आहे. तरीही, या तरुणाने अनेकदा विचारल्यावर तिने सांगितलं की, ती काहीतरी व्यवसाय करते.

    नवी दिल्ली 24 एप्रिल : तुम्ही पहिल्यांदाच एखाद्याच्या घरी गेलात आणि असा काही प्रश्न विचारला किंवा काहीतरी बोलला, जे तुम्ही करायला नको होतं, तर तुम्हाला कसं वाटेल? जेव्हा एखाद्याच्या विचित्र प्रश्नामुळे सगळेजण गोंधळतात आणि लाजतात तेव्हा ही परिस्थिती अतिशय वेगळीच (Awkward Situation) बनून जाते. असाच एक प्रकार एका व्यक्तीच्या बाबतीत घडला. आपण विचारलेला सवाल अनेकांसाठी डोकेदुखी ठरू शकतो, याची त्याला कल्पनाही नव्हती. पहिल्यांदाच प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबीयांना भेटायला गेलेल्या तरुणासमोर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. इतकंच नाही तर त्यानं गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयांनाही लाजवलं. या व्यक्तीने फक्त इतकंच म्हटलं की त्याच्या प्रेयसीच्या बहिणीला त्याने आधी कुठेतरी पाहिलं आहे, असं त्याला वाटतंय. खरंतर त्याच्या गर्लफ्रेंडची बहीण अॅडल्ट फिल्म्समध्ये (Adult Films) काम करायची, ज्याबद्दल कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना माहिती नव्हती. आता त्या व्यक्तीला त्याची चूक काय आहे, हे रेडिटवर लोकांकडून जाणून घ्यायचं आहे. गर्लफ्रेंडने दिलं अतिशय विचित्र गिफ्ट; पाहताच सरकली तरुणाच्या पायाखालची जमीन या तरुणाने गर्लफ्रेंडच्या बहिणीबद्दल विचारताच सर्वांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. आधी बहिणीनं सांगितलं की ती अभिनेत्री आहे. तरीही, या तरुणाने अनेकदा विचारल्यावर तिने सांगितलं की, ती काहीतरी व्यवसाय करते. तरीही या उत्तराने तरुणाचं समाधान झालं नाही कारण ती खूप ओळखीची वाटत होती. शेवटी गर्लफ्रेंडच्या भावाने त्या तरुणाचा हात पकडला आणि त्याला बाजूला ओढून नेलं, जिथे त्याने सांगितलं की त्याची बहीण अॅडल्ट स्टार आहे. गर्लफ्रेंडच्या भावाने सांगितलं की घरातील इतर सदस्यांना याबाबत काहीच माहिती नाही. अशा परिस्थितीत तू तिच्या कामाबद्दल वारंवार विचारणा करून समस्या निर्माण करू शकतो. यानंतर या तरुणाची बोलतीच बंद झाली. आता पुढे काय करावं, हेच त्याला कळत नव्हतं. भंगार झालेल्या बसला या माणसानं बनवलं Dream Place, आता गर्लफ्रेंडसोबत साजरी करतो सुट्टी! गर्लफ्रेंडच्या बहिणीचं सत्य जाणून तो तरुण गप्प बसला. मात्र गर्लफ्रेंड त्याच्यावर नाराज होती. कुटुंबासमोर लाजीरवाणी परिस्थिती निर्माण केल्याचा ती त्याच्यावर वारंवार आरोप करत होती. बहिणीचं सत्य घरच्यांसमोर आणल्याचा आरोप तिने केला. या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली, जी सतत सुरू राहिली. आता त्या तरुणाने reddit ची मदत घेतली आणि लोकांना विचारलं की त्याचा काय दोष आहे? यूजर्स या मुद्द्यावरुन तरुणाचं समर्थन करत आहेत.
    First published:

    Tags: Girlfriend, Viral news

    पुढील बातम्या