मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ना Shaving razor रेझर, ना Trimmer; पठ्ठ्याने फक्त हातानेच केली हजामत; पाहा VIDEO

ना Shaving razor रेझर, ना Trimmer; पठ्ठ्याने फक्त हातानेच केली हजामत; पाहा VIDEO

शेव्हिंग किट सोडा त्याने दाढी करताना साधं रेझरही वापरलं नाही.

शेव्हिंग किट सोडा त्याने दाढी करताना साधं रेझरही वापरलं नाही.

शेव्हिंग किट सोडा त्याने दाढी करताना साधं रेझरही वापरलं नाही.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 24 नोव्हेंबर : दाढी करायची (Shaving) म्हटली की शेव्हिंग मशीन, शेव्हिंग फोम, शेव्हिंग क्रीम, आफ्टर शेव्हिंग क्रीम असं शेव्हिंगचं किटच (Shaving kit) असतं. बरेच लोक अशा शेव्हिंग किटचा वापर करतात (Shaving video). तरीसुद्धा दाढी करताना कापलं जाण्याची भीती कितीतरी जणांना वाटते. पण एका पठ्ठ्याने तर असं शेव्हिंगचं स्पेशल किट सोडा त्याने साधं रेझरही वापरलं नाही. तर फक्त हातानेच शेव्हिंग केली आहे (Shaving only with hand and blade).

एका व्यक्तीने हातात फक्त एक ब्लेड घेऊन शेव्हिंग करून दाखवलं आहे. ब्लेड रेझरमध्ये टाकलं तरी ते व्यवस्थित हाताळलं नाही तर चेहऱ्यावर जखम होते. मग विचार करा. फक्त एक पातळ ब्लेड हातात धरून या व्यक्तीने कशी काय शेव्हिंग केली असावी, नाही का? आता याचं उत्तर तर तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच मिळेल.

एरवी लोक सलूनमध्ये जातात. खुर्चीत आरामात बसतात आणि आपली हजामत करवून घेतात किंवा घरीच शेव्हिंग किट वापरून शेव्हिंग करतात. पण इथं मात्र रस्त्यावरच हजामत केली जाते आहे.

हे वाचा - खतरनाक हजामत! कैचीऐवजी सुरा, हातोडा, काच आणि आग; हेअर कटिंगचा हा VIDEO पाहूनच फुटेल घाम

व्हिडीओत पाहू शकता पाठीला कोणताही आधार न घेता एक तरुण बसला आहे. एक एक व्यक्ती हातात ब्लेड घेऊन त्याची दाढी करते आहे. अगदी हळुवारपणे तो चेहऱ्यावरील केस काढताना दिसतो आहे. ना शेव्हिंग करणाऱ्याला ना करवून घेणाऱ्याला भीती वाटते आहे. दोघंही अगदी बिनधास्त आहेत.

देवाशीष प्रमाणिक नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. भारतीय जुगाड, हात आणि ब्लेडने शेव्हिंग केली जाते आहे, कोणत्याही शेव्हिंग किटची गरज नाही.

हे वाचा - हजामत पाहूनच फुटला घाम; जीव मुठीत धरून सलूनमधून पळाला तरुण; VIDEO VIRAL

याआधी एका व्यक्तीनेही अशीच विचित्र हजामत केली होती. त्याने तर चक्क सायकलवरूनच दाढी केली होती. ब्युटी ऑफ पटना इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे बिहार आहे आणि इथं काहीच अशक्य नाही. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता, दोन व्यक्ती सायकलवर बसलेल्या आहेत. दोन्ही सायकल रस्त्याच्या मधोमध एकत्र उभ्या केलेल्या आहेत. एका सायकलर न्हावी बसला आहे. जो दुसऱ्या सायकलवर हसलेल्या व्यक्तीची दाढी करतो आहे. दाढी करणारी व्यक्तीसुद्धा अगदी आरामात आहे. अशा पद्धतीने दाढी करवून घेताना काही त्रास होतो आहे, हे त्याच्या चेहऱ्यावरून तरी दिसून येत नाही.

First published:

Tags: Viral, Viral videos