• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • घराच्या भिंतीत युवकाला आढळलं असं काही की पाहूनच उडाला थरकाप, पोलीस तपासात समोर आलं सत्य

घराच्या भिंतीत युवकाला आढळलं असं काही की पाहूनच उडाला थरकाप, पोलीस तपासात समोर आलं सत्य

फ्रांसिस चकी रेवेन नावाच्या एका टिकटॉक यूजरला (Tiktok User) आपल्या घराच्या भिंतीत (House Walls) असं काही आढळलं की ते पाहूनच त्याला धक्का बसला

  • Share this:
    नवी दिल्ली 03 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत ज्यात घरातच जुना मालक, बिल्डर किंवा इलेक्ट्रिशियननं लपवलेल्या काही चिठ्ठ्या किंवा पैसे आणि इतर वस्तू आढळल्या आहेत. मात्र फ्रांसिस चकी रेवेन नावाच्या एका टिकटॉक यूजरला (Tiktok User) आपल्या घराच्या भिंतीत (House Walls) असं काही आढळलं की ते पाहूनच त्याला धक्का बसला. फ्रांसिसनं लगेचच पोलिसांना बोलवावं लागलं. भिंतीत आढळलेल्या गोष्टीचा व्हिडिओ जेव्हा त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) अपलोड केला, तेव्हा तो व्हायरल (Video Viral) होऊ लागला. 14 वर्षीय मुलीसोबत भावांकडून विकृत कृत्य; शाळेतील आरोग्य तपासणीत काळंबेरं उघड मिरर यूकेच्या वृत्तानुसार, फ्रांसिसनं टिकटॉकवर जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात सांगितलं आहे की त्यांना आपल्या घराच्या भिंतीमध्ये हाडे (Bones in House Wall) आढळली. या व्यक्तीनं कॅप्शन देत लिहिलं, की आता मी पोलिसांच्या येण्याची वाट पाहत आहे. मला नाही माहिती की ही कोणाची हाडे आहेत. काहीच वेळात हा व्हिडिओ 20 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. लोकांनी लगेचच या पोस्टवर कमेंट करण्यास सुरुवात केली. अनेक यूजर्सचं असं म्हणणं होतं, की ही हाडे माणसाची नाहीत. तर काहींनी म्हटलं की ही हाडे माणसाची असो किंवा प्राण्याची मात्र भिंतीत कशी पोहोचली. पोटच्या मुलासोबत करायची धक्कादायक कृत्य; महिलेचा प्रताप वाचून व्हाल सुन्न एका यूजरनं लिहिलं, की तुमचं घर जुनं आहे आणि आधी बरेच लोक आपल्या मृत पाळीव प्राण्यांचे अवशेष भितींमध्ये ठेवत असत, जेणेकरून हे कायम त्यांच्यासोबत राहतील. पोलिसांनी तपास केल्यानंतर सांगितलं, की ही हाडे मेंढीची आहेत. हे समजल्यानंतर फ्रांसिसला बरं वाटलं आणि त्यांची चिंता दूर झाली. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रांसिसनं म्हटलं की या कामामुळे पोलिसांना उगीच वेळ गेला. मात्र, पोलिसांना याची माहिती देणं माझं काम होतं. मला हे समजणं गरजेचं होतं, की या भिंतीत हाडे का होती? मी त्याकडे असंच दुर्लक्ष करू शकत नव्हतो.
    Published by:Kiran Pharate
    First published: