निकने सांगितलं की, 6 वर्षांपूर्वी त्याचे केस खूप गळत होते. त्याच्या केसांखालची स्किनही बाजूने दिसू लागली होती आणि कॉलेजला जाताना त्याला जास्तीचे शर्ट सोबत घेऊन जावं लागत असे. कारण त्याने घातलेल्या शर्टवरही केस अडकायचे. मग त्याने ठरवलं की तो केसांना शॅम्पू लावणं सोडणार (Man Stopped using Shampoo for 6 Years to Stop Hair fall). गेल्या 6 वर्षांपासून निकने केसांवर शॅम्पूचा एक थेंबही लावला नाही आणि आता त्याचे केस अतिशय दाट झाले आहेत. चुकून पुरुषाचा धक्का लागला अन् महिला जिंकली 75 कोटी! निकने व्हिडिओमध्ये सांगितले की, शॅम्पूमध्ये अनेक रसायने असतात ज्यामुळे आपले केस खराब होतात. अशा परिस्थितीत, त्याने शॅम्पू वापरणं बंद करताच, काही दिवसांनी केसांची वाढही वाढली. आता तो सर्वांना हाच सल्ला देतो. तो म्हणाला की तो रोज डोक्यावर फक्त पाणी घेतो पण केसांना शॅम्पू लावत नाही. शॅम्पूशिवाय केस काही दिवस कोरडे वाटतात, पण नंतर आपोआपच केसांमधून नैसर्गिक तेल बाहेर पडू लागतं, ज्यामुळे केस मऊ होतात.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.