मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: हा कोणता विचित्र रेकॉर्ड? मोठ्या साबणाच्या फुग्यात फुगवले छोटे 783 फुगे, गिनीज बुकमध्ये नोंद

VIDEO: हा कोणता विचित्र रेकॉर्ड? मोठ्या साबणाच्या फुग्यात फुगवले छोटे 783 फुगे, गिनीज बुकमध्ये नोंद

सोशल मीडियावर (Social Media) अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असून यामध्ये व्यक्ती एका मोठ्या साबणाच्या फुग्यामध्ये (Soap Bubble) लहान लहान साबणाचे फुगे फुगवताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असून यामध्ये व्यक्ती एका मोठ्या साबणाच्या फुग्यामध्ये (Soap Bubble) लहान लहान साबणाचे फुगे फुगवताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असून यामध्ये व्यक्ती एका मोठ्या साबणाच्या फुग्यामध्ये (Soap Bubble) लहान लहान साबणाचे फुगे फुगवताना दिसून येत आहे.

मुंबई, 09 जानेवारी: जगभरात विविध कला अंगी असणारी लोकं आहेत. अनेकजण आपल्या करामती कृत्यांनी आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Record) देखील नोंदवतात. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असून यामध्ये व्यक्ती एका मोठ्या साबणाच्या फुग्यामध्ये (Soap Bubble) लहान लहान साबणाचे फुगे फुगवताना दिसून येत आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Record) फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला असून Chang Yu-Te नावाचा हा व्यक्ती या मोठ्या साबणाच्या फुग्यामध्ये लहान फुगे फुगवत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो कि, या व्यक्तीने एक मोठा साबणाचा फुगा तयार केला असून यामध्ये तो अनेक लहान लहान आकाराचे साबणाचे फुगे तयार करत आहे. या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याने या फुग्यामध्ये लहान आकाराचे तब्बल783 फुगे फुगवले आहेत.

चार मिनिटाचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी या व्हिडिओला शानदार कॅप्शन देखील दिलं आहे. सारे फुगे यामध्ये फुगवण्यात आले आहेत. 4 जानेवारीला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला 6 लाखांपेक्षा जास्त Views आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहे. फेसबुकवर अनेकांनी हा व्हिडीओ त्यांच्या वॉलवर शेअर केला आहे.   या व्हिडिओतील सुरुवातीच्या 2 मिनिटांमध्ये त्यांचा सर्वात जास्त साबणाचे फुगे (Soap Bubble) तयार करण्याचा रेकॉर्ड दाखवण्यात आला असून दुसऱ्या 2 मिनिटांमध्ये त्यांचा दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड दाखवण्यात आला आहे. Yu-Te यांच्या नावावर यापूर्वी हातावर सर्वाधिक साबणाचे फुगे बाउंस करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहे. त्यांनी 290 वेळा हातावर हे फुगे फुगवून ते बाउंस करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याने नुकत्याच केलेल्या कारनाम्याने नेटिजन्स प्रभावित झाले आहेत. अनेकांनी त्याच्या या प्रतिभेला अमेझिंग आणि खूपच सुंदर म्हटले आहे.

दरम्यान, एका युजरने यावर प्रतिक्रिया देताना Yu-Te यासाठी कोणता साबण वापरात आहे असा प्रश्न विचारला आहे. त्याला साबणाचा एकही फुगा फुगवण्यात यश आले नसल्याने तो असा कोणता साबण वापरात आहे ज्या मदतीने तो इतके सगळे साबणाचे फुगे तयार करत आहे. तर अनेकांनी हे फुगे कसे मोजले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. एकाने सर्वजण या फुग्यांकडे पाहत असताना मी मात्र त्याने एकाच श्वासात कशापद्धतीने हे फुगे फुगवले यामुळे प्रभावित झालो असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने हे फुगे मोजणाऱ्याचा सन्मान केला पाहिजे असे म्हटले आहे. त्याचबारोबर एकाने सूर्यामध्ये किती ज्युपिटर मावू शकतात याचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे हे फुगे कसे मोजले याविषयी आश्चर्य व्यक्त करणाऱ्या युजरच्या प्रश्नाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Record) उत्तर दिले आहे. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये पाहून हे फुगे मोजल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे.

First published: