मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्रेमविवाहानंतर पहिल्यांदाच पत्नीला विना मेकअप पाहून हादरला पती; उचललं मोठं पाऊल, जाणून व्हाल हैराण

प्रेमविवाहानंतर पहिल्यांदाच पत्नीला विना मेकअप पाहून हादरला पती; उचललं मोठं पाऊल, जाणून व्हाल हैराण

इजिप्तचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचं फेसबुकवरच एका तरुणीवर प्रेम जडलं. महिला नेहमीच आपले सुंदर फोटो पोस्ट करत असे. दोघांची २-३ वेळा भेटही झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा  निर्णय घेतला.

इजिप्तचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचं फेसबुकवरच एका तरुणीवर प्रेम जडलं. महिला नेहमीच आपले सुंदर फोटो पोस्ट करत असे. दोघांची २-३ वेळा भेटही झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

इजिप्तचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचं फेसबुकवरच एका तरुणीवर प्रेम जडलं. महिला नेहमीच आपले सुंदर फोटो पोस्ट करत असे. दोघांची २-३ वेळा भेटही झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : म्हणतात की प्रेम आंधळं असतं. जे लोक एकमेकांवर प्रेम करतात ते समोरच्याचा रंग-रूप पाहत नाहीत. ते केवळ एकमेकांचं मन आणि स्वभाव पाहतात. अनेक लोक तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनच एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र, अनेकदा असं पाहायला मिळतं, की सोशल मीडियावरील (Social Media) हे प्रेम अधिक काळ टीकत नाही. नुकतंच इजिप्तच्या एका व्यक्तीसोबतही असंच घडलं. त्यानं फेसबुकच्या माध्यमातून (Facebook Love Story) एक मुलगी पसंत केली आणि दोघांचं लग्नही झालं. मात्र लग्नानंतर जेव्हा त्यानं पहिल्यांदा आपल्या नव्या नवरीला विनामेकअप पाहिलं तेव्हा त्याला धक्का बसला (Man Shocked After Seeing Wife Without Makeup).

...अन् अचानक मांडीवर येऊन बसला साप; पाहा पुढे काय घडलं, धडकी भरवणारा VIDEO

ही बातमी ऐकून लोकांना वाटलं, की ही एखाद्या कॉमेडी सीरियलची कथा आहे, मात्र ही घटना खरी आहे. रिपोर्ट्सनुसार, इजिप्तचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचं फेसबुकवरच एका तरुणीवर प्रेम जडलं. महिला नेहमीच आपले सुंदर फोटो पोस्ट करत असे. दोघांची २-३ वेळा भेटही झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, खरी समस्या लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उभा राहिली. जेव्हा या व्यक्तीनं पहिल्यांदा आपल्या पत्नीला विनामेकअप पाहिलं.

हेलियोपॉलिसच्या फॅमिली कोर्टमध्ये या व्यक्तीनं म्हटलं, की लग्नानंतर आपल्या पत्नीला विनामेकअप पाहून तो हैराण झाला. या व्यक्तीनं म्हटलं, की त्याची पत्नी प्रत्यक्षात या फेसबुक फोटोपेक्षा फार वेगळी दिसते. त्यानं म्हटलं, की माझी फसवणूक झाली असून मला घटस्फोट हवा आहे (Man Seeks Divorce After Seeing Wife Without Makeup). या व्यक्तीनं म्हटलं की तिनं मला अंधारात ठेवलं, लग्नाआधी ती भरपूर मेकअप करत असे यामुळे तिचा खरा चेहरा समजला नाही. मात्र लग्नानंतर तिला मेकअपशिवाय पाहिल्यावर समजलं की ती अतिशय कुरूप दिसते. त्यामुळे मला घटस्फोट पाहिजे.

भरधाव वेगातील दुचाकीस्वाराला गाईनं शिंगावर घेतलं अन्...; SHOCKING VIDEO

या व्यक्तीनं म्हटलं, की लग्नानंतर एका वर्षापर्यंत त्यानं आपल्या पत्नीचा हा चेहरा सहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान त्याला सतत आपली फसवणूक झाल्याचे वाटत असे. यामुळे त्याने एका वर्षाने घटस्फोटासाठी अर्ज केला. या व्यक्तीनं म्हटलं, की मी मागील बऱ्याच काळापासून तिला विनामेकअप पाहात आहे. जेव्हा ती झोपेतून उठते तेव्हा तिचे केस विस्कटलेले असतात. ती अजिबातही तशी दिसत नाही, जशी आधी दिसायची.

First published:
top videos

    Tags: Love story, Viral news