मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: मगरीच्या तावडीत सापडला कुत्रा; वाचवण्यासाठी तरुणाने केलेलं भलं काम पाहून वाटेल अभिमान

VIDEO: मगरीच्या तावडीत सापडला कुत्रा; वाचवण्यासाठी तरुणाने केलेलं भलं काम पाहून वाटेल अभिमान

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुत्रा मगरींनी भरलेल्या एका तलावात अडकला आहे. तो बाहेर येण्याचा भरपूर प्रयत्न करतो. मात्र, पाण्यातून त्याला बाहेर निघता येत नाही

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 05 डिसेंबर : माणुसकी आणि चांगुलपणा कशाला म्हणतात हे तुम्हाला सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ (Heart Touching Viral Video) पाहून समजेल. हा व्हायरल व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. कारण यातून माणुसकीचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. हा व्हिडिओ आपल्याला गरजूंची मदत करायला शिकवतो. अनेक लोक केवळ माणूसच नाही तर प्राण्यांचीही मदत करण्यासाठी पुढे येतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. असं म्हटलं जातं की या जगात माणुसकीपेक्षा मोठा कुठलाही धर्म नाही. त्यामुळे प्रत्येक अशा गरजू व्यक्तीची मदत करायला हवी, ज्याला तुमच्या मदतीची गरज आहे. अनेक लोक असेही असतात जे आपलं सर्वकाही पणाला लावून समोच्याची मदत करतात. तर, काही लोक शक्य असूनही समोच्याला मदत करणं टाळतात. सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात या व्यक्ती माणुसकी दाखवत एका कुत्र्याचा जीव वाचवला आहे (Man Saves Life of a Dog). व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुत्रा मगरींनी भरलेल्या एका तलावात अडकला आहे. तो बाहेर येण्याचा भरपूर प्रयत्न करतो. मात्र, पाण्यातून त्याला बाहेर निघता येत नाही. इतक्यात एक व्यक्ती तिथे येतो आणि या पाण्यात कापड फेकतो. यालाच पकडून कुत्रा वरती येतो आणि हा व्यक्ती मगरींच्या तावडीतून कुत्र्याला वाचवतो.
या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, या व्यक्तीची माणुसकी पाहून माझे डोळे पाणावले. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, माणुसकीवर माझा पुन्हा एकदा विश्वास बसला. अनेकांनी म्हटलं की आपण यातून धडा घ्यायला हवा. गरजूंना मदत करायला हवी. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हि़डिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर helicopter_yatra_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत याला 40 लाखाहून अधिका व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.
First published:

Tags: Crocodile, Dog, Video Viral On Social Media

पुढील बातम्या