मराठी बातम्या /बातम्या /Viral /मुलाला कडेवर घेतलेलं असतानाच घसरला पाय; बाळाला वाचवण्यासाठी पित्याने जे केलं ते पाहून व्हाल थक्क, VIDEO

मुलाला कडेवर घेतलेलं असतानाच घसरला पाय; बाळाला वाचवण्यासाठी पित्याने जे केलं ते पाहून व्हाल थक्क, VIDEO

व्हिडिओमध्ये (Viral Video of Super Dad) घराबाहेरील दृश्य दिसत आहे. घराच्या दारात बसवलेल्या कॅमेऱ्यात संपूर्ण घटनेचं रेकॉर्डिंग झालं आहे

व्हिडिओमध्ये (Viral Video of Super Dad) घराबाहेरील दृश्य दिसत आहे. घराच्या दारात बसवलेल्या कॅमेऱ्यात संपूर्ण घटनेचं रेकॉर्डिंग झालं आहे

व्हिडिओमध्ये (Viral Video of Super Dad) घराबाहेरील दृश्य दिसत आहे. घराच्या दारात बसवलेल्या कॅमेऱ्यात संपूर्ण घटनेचं रेकॉर्डिंग झालं आहे

नवी दिल्ली 07 मार्च : पालक आपल्या मुलांची खूप काळजी घेतात. त्यांना कोणतीही गैरसोय होऊ देत नाहीत, मग दुखापत तर दूरच. मुलाला कोणताही धोका निर्माण झाला तर पालक त्याला अक्षरशः आपल्या डोक्यावर घेतात. सध्या अशाच एका बापाचा व्हिडिओ (Father Saves kid from Falling) खूप चर्चेत आहे. या व्यक्तीने आपल्या मुलाचा ज्याप्रकारे जीव वाचवला, ते पाहून सगळेच थक्क झाले.

म्हणे, 'देवाची इच्छा पूर्ण करतोय'; 16 मुलांचे आईबाबा करतायेत 17व्या बाळाची तयारी

व्हायरल व्हिडिओंसाठी प्रसिद्ध सोशल मीडिया अकाउंट व्हायरल हॉगने अलीकडेच आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो अमेरिकेतील ओहियो येथील आहे. व्हिडिओमध्ये (Viral Video of Super Dad) घराबाहेरील दृश्य दिसत आहे. घराच्या दारात बसवलेल्या कॅमेऱ्यात संपूर्ण घटनेचं रेकॉर्डिंग झालं आहे. यात दोन लहान मुलं आणि त्यांच्यासोबत त्यांचे वडील बाहेर येताना दिसतात. वडिलांच्या कुशीत एक लहान मूलही आहे.

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

ही व्यक्ती घराच्या दारातून बाहेर पडताच पुढच्या कच्च्या रस्त्यावर त्याचा पाय घसरतो आणि तो पडू लागतो. तो गवतावर कोसळू लागतो आणि समोर असलेल्या एका भांड्याकडे त्याच्या कडेवरील बाळाचं तोंड होतं. मात्र कोसळतानाही या पित्याने आपल्या मुलाची पूर्ण काळजी घेतली. त्याने मुलाला या भांड्यापासून आणि जमिनीवर कोसळण्यापासून वाचवलं आणि आपल्या छातीवरच दाबून धरलं. यामुळे घटनेत बाळाला थोडीही दुखापत झाली नाही.

बससमोर स्टंट करणं पडलं महागात; रस्त्यावरच पलटी झाली कार, अपघाताचा LIVE VIDEO

हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या भरपूर पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत 58 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओ निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की जेव्हा सगळं वातावरण शांत होईल आणि त्याच्यातील जोश थंड पडेल तेव्हा त्याला आपल्या पायाला होणाऱ्या वेदना समजतील. मात्र त्याने अतिशय चांगलं काम केलं आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एकाने म्हटलं की तो समजू शकतो की जेव्हा बाळाच्या आईने हा व्हिडिओ पाहिला असेल तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल.

First published:

Tags: Shocking video viral, Video Viral On Social Media