मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! व्यक्तीच्या मागेच लागला विषारी साप; स्वतःच्या बचावासाठी तरुणाने हातात पकडला पण..हादरवणारा VIDEO

बापरे! व्यक्तीच्या मागेच लागला विषारी साप; स्वतःच्या बचावासाठी तरुणाने हातात पकडला पण..हादरवणारा VIDEO

विषारी साप रागावतो आणि एका व्यक्तीच्या मागे लागतो. या दरम्यान व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी सापापासून सुटका करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो

विषारी साप रागावतो आणि एका व्यक्तीच्या मागे लागतो. या दरम्यान व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी सापापासून सुटका करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो

विषारी साप रागावतो आणि एका व्यक्तीच्या मागे लागतो. या दरम्यान व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी सापापासून सुटका करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 12 मार्च : साधारणपणे जगभरात अनेक प्रकारचे विषारी आणि प्राणघातक साप आढळतात. ज्याच्या विषाचा फक्त एक थेंब कोणत्याही माणसाचा जीव घेण्यासाठी पुरेसा आहे. अशा परिस्थितीत सापासमोर येण्याचं धाडस कोणीही करू शकत नाही. दुसरीकडे साप समोर दिसला तरी लोक त्याच्यावर हल्ला करण्याऐवजी तिथून पळ काढताना दिसतात.

भटक्या बैलाचा चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला, भयानक Video आला समोर

नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये विषारी साप रागावतो आणि एका व्यक्तीच्या मागे लागतो. या दरम्यान व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी सापापासून सुटका करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. यानंतरही साप त्या व्यक्तीचा पाठलाग करणं सोडत नाही आणि आक्रमक होऊन त्याच्यावर वेगाने हल्ला करताना दिसतो. जे पाहून युजर्सना घाम फुटला असून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो वृत्त लिहिपर्यंत सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर second before death नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घरात शिरताना दिसत आहे. यादरम्यान त्याच्या मागे एक चपळ आणि विषारी साप आलेला दिसतो. हा साप त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.

स्वतःच्या बचावासाठी जेव्हा त्या व्यक्तीला काहीही मिळत नाही, तेव्हा तो त्याचा टी-शर्ट काढतो आणि सापावर फेकून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र माणसाचा प्रत्येक प्रयत्न फसतो. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, माणूस सर्वतोपरी लढाईसाठी तयार होतो आणि आपला जीव धोक्यात घालून तो सापाची शेपटी पकडून सापाला हवेत वेगाने फिरवतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्याला वृत्त लिहिपर्यंत लाखो व्ह्यूज आणि 7 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहताना यूजर्स त्या व्यक्तीच्या धाडसाचे सतत कौतुक करत आहेत. त्याचवेळी, त्यांच्यापैकी बहुतेकांचं म्हणणं आहे की त्यांच्यात या व्यक्तीप्रमाणे साप पकडण्याची ताकद आणि धैर्य दोन्ही नाही.

First published:
top videos

    Tags: Shocking video viral, Snake