मराठी बातम्या /बातम्या /Viral /समुद्रातील लाटांसोबत वाहत गेला व्यक्ती; मृत्यूच्या दारात पोहोचलेला असतानाच 'देवदूत' आला, Shocking Video

समुद्रातील लाटांसोबत वाहत गेला व्यक्ती; मृत्यूच्या दारात पोहोचलेला असतानाच 'देवदूत' आला, Shocking Video

लाटांच्या मध्यभागी अडकलेल्या या तरुणाला आता कोणीही वाचवू शकणार नाही, असं वाटतं. तेव्हाच एक व्यक्ती उंच लाटांमधून जेट घेऊन येते आणि त्याला आपल्या जवळ ओढू लागते

लाटांच्या मध्यभागी अडकलेल्या या तरुणाला आता कोणीही वाचवू शकणार नाही, असं वाटतं. तेव्हाच एक व्यक्ती उंच लाटांमधून जेट घेऊन येते आणि त्याला आपल्या जवळ ओढू लागते

लाटांच्या मध्यभागी अडकलेल्या या तरुणाला आता कोणीही वाचवू शकणार नाही, असं वाटतं. तेव्हाच एक व्यक्ती उंच लाटांमधून जेट घेऊन येते आणि त्याला आपल्या जवळ ओढू लागते

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 21 जानेवारी : समुद्राच्या लाटांशी खेळणं साहसी वाटतं परंतु कधीकधी ही मजा चांगलीच महागात पडू शकते. हेच दाखवणारा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये समुद्राच्या लाटांशी खेळणं एका व्यक्तीला मृत्यूच्या दारात घेऊन गेल्याचं पाहायला मिळतं. मात्र, तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला मृत्यूच्या जबड्यातून सोडवलं आणि परत आणलं.

हा धक्कादायक व्हिडिओ वॉच पीपल सर्व्हाइव्ह नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला असून त्याला खूप पसंती मिळत आहे. एक व्यक्ती मजा करण्याच्या उद्देशाने समुद्रात उतरल्याचं व्हिडिओत दिसत आहे. तो पोहतो पण अचानक बुडू लागतो. दरम्यान, समुद्रात वादळ येतं. खूप उंच लाटा उसळू लागतात.

बापरे! हिंमत पाहूनच व्हाल शॉक, मगरीवर बसून दुचाकी चालवताना दिसला व्यक्ती, पुढे काय झालं पाहा..VIDEO

लाटांच्या मध्यभागी अडकलेल्या या तरुणाला आता कोणीही वाचवू शकणार नाही, असं वाटतं. तेव्हाच एक व्यक्ती उंच लाटांमधून जेट घेऊन येते आणि त्याला आपल्या जवळ ओढू लागते. यानंतर असं काही घडतं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. सुमारे पन्नास फूट उंचीची एक मोठी लाट येते आणि त्या दोघांनाही आपल्या कवेत घेण्याच्या बेतात दिसते. त्यामुळे बुडणाऱ्याचा हात दुसऱ्या व्यक्तीच्या हातातून सुटतो. पण तो हार मानत नाही. जेट पकडतो आणि दोघेही समुद्राच्या या उंच लाटेमधून बाहेर पडतात. व्हिडिओ पाहून लोक या व्यक्तीचं कौतुक करत आहेत.

हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे हे कळू शकलेलं नाही, पण शेअर केल्यापासून तो सुमारे 4.5 लाख वेळा पाहिला गेला आहे. सुमारे 15 हजार लोकांनी लाईक केला आहे आणि हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, ज्याने वाचवलं त्या व्यक्तीला सलाम. त्याच्याकडे खरोखर अद्भुत शक्ती आहे.

महिलेनं ब्रेकऐवजी दाबला अ‍ॅक्सिलरेटर अन् मग..; कारच्या भीषण अपघाताचा Live Video

एकाने प्रश्न केला की, एवढ्या उंच लाटेपासून वाचणं शक्य आहे का? तर दुसरा म्हणाला, देव या माणसाच्या पाठीशी होता, नाहीतर वाचणं अवघड होतं. एका व्यक्तीने लिहिलं, हे मृत्यूला हरवून बाहेर येण्यासारखं आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Video viral