• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • एका सेकंदाचा फरक अन् मृत्यूच्या दारातून युवकानं स्वतःला आणलं परत; पाहा थरारक घटनेचा Slow Motion Video

एका सेकंदाचा फरक अन् मृत्यूच्या दारातून युवकानं स्वतःला आणलं परत; पाहा थरारक घटनेचा Slow Motion Video

या व्हिडिओत एक व्यक्ती बाथरूममध्ये (Bathroom) घसरून पडताना दिसत असून, तिथं असलेल्या अनेक गोष्टींना ती धडकते. धडपडत उठून ती व्यक्ती बाहेर पडते तोच तिच्यावर एक चित्ता (Cheetah) झेप घेताना दिसतो

  • Share this:
नवी दिल्ली 26 जून : जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणार हे सत्य असलं तरी आपण कधी मरण पावणार हे कुणालाच माहीत नसतं आणि ते कोणाच्या हातातही नसतं. हा सगळा नशिबाचा खेळ आहे, असं म्हटलं जातं. कधी कोणाचा छोट्याशा अपघातातही मृत्यू होतो, तर कोणी भयंकर अपघातातूनही वाचतो. कधीकधी अक्षरशः काही क्षणांच्या फरकानं एखाद्याची मृत्यूच्या जबड्यातून सुटका होते. अशा वेळी 'देव तारी त्याला कोण मारी' असा अनुभव येतो. असाच जीवन-मृत्यूच्या (Life and Death) संघर्षाचा एक थरारक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. आयुष्याची दोरी बळकट असेल तर एका सेकंदाच्या फरकानंही कसं जीवनदान मिळतं याचं प्रत्यक्ष दर्शन यात घडतं. 'इंडिया टीव्ही'नं दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ भारतीय वनसेवा विभागात (Indian Forest Service) अधिकारी असलेल्या सुशांत नंदा (Sushant Nanda) यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. 'मृत्यू अगदी जवळ होता' असं कॅप्शन त्याला दिलं आहे. हा व्हिडिओ स्लो मोशनमधील असून, तो बघताना जीवन-मरणाच्या संघर्षातील झटापट थरारून टाकत आहे. आतापर्यंत 18 हजारपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडिओ बघितला असून, दीड हजार जणांनी तो लाइक केला आहे. सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. एका रात्रीत गरोदर महिलेचं जडलं 150 मुलांच्या बापावर प्रेम; वाचा अनोखी Love Story या व्हिडिओत एक व्यक्ती बाथरूममध्ये (Bathroom) घसरून पडताना दिसत असून, तिथं असलेल्या अनेक गोष्टींना ती धडकते. धडपडत उठून ती व्यक्ती बाहेर पडते तोच तिच्यावर एक चित्ता (Cheetah) झेप घेताना दिसतो. एक क्षण तो तिथेच थांबला असता तर त्या चित्त्याची शिकार झाला असता. त्या चित्त्यानं त्याच्यावर हल्ला करून ठार केलं असतं; पण केवळ दैव बलवत्तर म्हणूनच तो धडपडत उठून बाहेर धावला आणि त्याला जीवनदान मिळालं. अभिनेत्रींनाही मागे टाकेल इतकी हॉट आहे ही योगा टीचर; महिन्याला कमवते 73 लाख अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स केल्या असून, 'यानंतर काय झालं तो माणूस वाचला का?' असं विचारलं आहे. अनेकांनी चित्ता शिकार करण्यासाठी नव्हे तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इथं आला असावा असं म्हटलं आहे. हा व्हिडिओ बघताना अतिशय भीती वाटते; पण त्या व्यक्तीला मिळालेलं जीवनदान बघून अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. 'देव तारी त्याला कोण मारी' याचीच प्रचिती यातून येते.
Published by:Kiran Pharate
First published: