Home /News /viral /

VIDEO: सहाव्या मजल्याहून कोसळली आणि खिडकीला लटकली चिमुकली, मदतीसाठी हाक देत होती इतक्यात..

VIDEO: सहाव्या मजल्याहून कोसळली आणि खिडकीला लटकली चिमुकली, मदतीसाठी हाक देत होती इतक्यात..

सुरक्षा ग्रील्समध्ये अडकलेली मुलगी जोरजोरात ओरडू लागली. शेजारीच असलेल्या एन पेंगने मुलीची वेदनादायक किंकाळी ऐकली, म्हणून तो तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी धावला.

    नवी दिल्ली 26 मे : खिडकीला लटकलेल्या मुलीला वाचवण्यासाठी एक व्यक्ती कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढला. हा पराक्रम केल्यानंतर त्या धाडसी व्यक्तीचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. मध्य चीनच्या शांक्सी प्रांतात ही घटना घडली, जिथे 5 वर्षांची मुलगी खिडकीतून खाली पडल्यानंतर बाहेर लटकत राहिली. सुरक्षा ग्रील्समध्ये अडकलेली मुलगी जोरजोरात ओरडू लागली. शेजारीच असलेल्या एन पेंगने मुलीची वेदनादायक किंकाळी ऐकली, म्हणून तो तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी धावला. अंडी चोरण्यासाठी आलेल्या तरुणीला मोराने आधी धक्का देऊन खाली पाडलं; मग केला हल्ला, Shocking Video पीपल्स डेली ऑनलाइननं वृत्त दिलं, की सुरक्षिततेची काळजी न करता त्याने निवासी ब्लॉकसमोरील सुरक्षा पट्टीचा वापर करून इमारतीवर चढण्यास सुरुवात केली. तो माणूस सहाव्या मजल्यावर पोहोचताच त्याने खिडकीच्या ग्रीलला लटकलेल्या चिमुरडीला पकडून 10 मिनिटे तिला तिथून सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीच्या आईने घटनास्थळ गाठून तिला सुखरूप खाली आणण्यास मदत केली. त्या व्यक्तीने सरकारी मीडिया आउटलेट पीपल्स डेलीला सांगितलं, की 'ती खूप घाबरली होती आणि रडत होती. मी तिला घाबरू नकोस असं सांगितलं आणि समजावून सांगितलं की मी तिला वाचवायला येत आहे.' आता हा व्हिडिओ (Shocking Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी या भल्या माणसाचं खूप कौतुक केलं आहे. नेटिझन्सनी या व्यक्तीचे धैर्य आणि निस्वार्थीपणाबद्दल आभार मानले. एका यूजरने लिहिलं की, 'एका खऱ्या हिरोने तिला वाचवलं. देव त्याला आशीर्वाद देवो. चमत्कार! तिसऱ्या मजल्यावरून कोसळली पण साधं खरचटलंही नाही; दीड वर्षांच्या चिमुकलीला पाहून डॉक्टरही हैराण अलीकडेच कझाकस्तानमध्ये 8 व्या मजल्यावर लटकलेल्या मुलीला वाचवण्यासाठी एका व्यक्तीने टॉवरवर चढून धाडस दाखवत तिचा जीव वाचवला होता. या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून टॉवरवर चढताना दिसला होता. यात घटनेत मुलीची आई खरेदीसाठी गेली असताना 3 वर्षीय मुलीने खिडकीतून बाहेर पाहण्यासाठी उशी आणि खेळणी यांचा वापर केला. यादरम्यान ही घटना घडली. मात्र सुदैवाने तिचा जीव वाचला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral

    पुढील बातम्या