Home /News /viral /

भरधाव बाईकस्वार होता ‘सातवे आसमानपर’, 14 हजारांच्या दंडामुळे आला जमिनीवर, पाहा VIDEO

भरधाव बाईकस्वार होता ‘सातवे आसमानपर’, 14 हजारांच्या दंडामुळे आला जमिनीवर, पाहा VIDEO

गुटखा चघळत भरधाव बुलेट चालवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. त्याला तब्बल 14 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    कानपूर, 13 डिसेंबर: हेल्मेट न घालता (without helmet) भरधाव बाईक (Over speeding bike) चालवून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral on social media) अपलोड करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल (Police fined) घडवली आहे. सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही स्टंटबाजीचे असतात. अनेकदा जीवघेणे आणि थरारक स्टंट करून युजर्सचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक जीवघेणा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी कारवाई करत अद्दल घडवली आहे. बुलेटवर केलं गाणं खालिद अहमद नावाचा हा तरुण बुलेटवर बसून रस्त्यात गाणं शूट करत आहे. गोविंदाच्या एका गाण्यावर लिपसिंक करून त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘मुझको ऐसी हाईफाई एक लुगाई चाहिए’, या गाण्यावर ओठांच्या हालचाली करणारा आणि तोंडात गुटखा चघळत बुलेट वेगाने चालवणारा हा तरुण व्हिडिओत दिसतो. पोलिसांनी केली कारवाई हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गाडीच्या नंबर प्लेटच्या आधारे तरुणाला शोधलं आणि त्याला 14 हजार रुपयांच्या दंडाची पावती पाठवली. रस्त्यात हेल्मेट न घालता भरधाव वेगानं गाडी चालवणं आणि वाहतुकीच्या कुठल्याही नियमांचं पालन करणं, असे आरोप तरुणावर ठेवण्यात आले आहेत. तरुणाला झाला पश्चात्ताप आपल्याला वाहतुकीच्या कायद्यांबाबत कल्पना नव्हती, त्यामुळे आपली चूक झाल्याची कबुली तरुणाने या व्हिडिओतच दिली आहे. मात्र आता 14 हजारांचा दंड बसल्यामुळे आयुष्यभर हे नियम आपल्या लक्षात राहतील, असं त्यानं म्हटलं आहे. आपल्याकडून चूक झाली, मात्र तुम्ही अशी चूक करू नका, असा सल्लाही त्याने इतरांना दिला आहे. हे वाचा- Big News: टिफिन बॉम्बचा जोरदार स्फोट, खेळता खेळता चिमुकल्याचा मृत्यू पोलिसांनी केला व्हिडिओ ट्विट उत्तर प्रदेश पोलिसांनीही हा व्हिडिओ ट्विटर करून वाहतुकीचे नियम न मोडण्याचं आवाहन केलं आहे. तरुणाची मस्ती आणि त्याला पोलिसांनी शिकवलेला धडा दाखवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bike riding, Song, Video viral

    पुढील बातम्या