मुंबई, 02 जुलै : तुमच्यासमोर एखाद्या बोअरवेलमध्ये एखादा प्राणी पडला तर तुम्ही काय कराल फार फार तर त्याला एखाद्या दोऱ्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न कराल. नाहीतर प्रशासनाला कळवाल. मात्र सध्या सोशल मीडियावर (social media) बोअरवेलमध्ये पडलेल्या एका बकरीच्या रेस्क्युचा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे. यामध्ये एका तरुणाने बकरीला (goat) वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावली आहे.
तसा हा व्हिडीओ एक वर्ष जुना असल्याचं सांगितलं जातं आहे. आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हरदी सिंह यांनी आपल्या ट्विटरवर दोन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Desi style rescue! Grit, determination, team work n courage.
व्हिडीओ आपण पाहू शकतो. बोअरवेलच्या आजूबाजूला सुरुवातीला काही तरुण बसलेले आहेत. या बोअरवेलमध्ये एक बकरी पडली आहे. तिला कसं वाचवायचं याचा विचार हे सर्वजण करतात. यानंतर एक तरुण आपलं डोकं थेट या बोअरवेलमध्ये घालतो. त्यानंतर त्याचे मित्र त्याचे दोन्ही पाय पकडून त्याला बोअरवेलमध्ये सोडतात. जवळपास 5 फुटापर्यंत तो आत जातो आणि बकरीला घेऊनच बाहेर येतो.
अशा देशी जुगाडाने हे सर्व जण त्या बकरीला सुखरूप बोअरवेलमधून बाहेर काढतात. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झालेत. सर्वांनीच या तरुणाच्या साहसाचं कौतुक केलं आहे.
Extremely dangerous. Salute to the man. He trusted his mates completely.
विशेष म्हणजे थोडी जरी चूक झाली असती तर ती तरुणाच्या जीवावर बेतली असती. मुक्या जीवाला वाचवण्यासाठी त्याने स्वत:चा जीवही धोक्यात घातला. त्यामुळे तरुणाने जे साहस दाखवलं आहे, त्याबाबत त्याला सन्मानित करायलाच हवं अशी मागणीही काही नेटिझन्सनी केली आहे.