स्वतःचा जीव धोक्यात घालत सापाला वाचवलं, तरुणाच्या धाडसाचा VIDEO VIRAL

स्वतःचा जीव धोक्यात घालत सापाला वाचवलं, तरुणाच्या धाडसाचा VIDEO VIRAL

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल(Viral) होत असून यामध्ये विहिरीत पडलेल्या सापाला वाचवताना एक व्यक्ती दिसून येत आहे. तरुणाच्या या धाडसाचं कौतुक होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई 16 फेब्रुवारी : अनेकदा साप(Snake) दिसल्यास आपण पुरतं घाबरून जातो. त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचं समजून आपण अनेकदा सापाला मारण्याचा प्रयत्न करतो. पण सापाला मारण्याऐवजी त्याला वाचवणारेदेखील अनेकजण आहेत. अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल(Viral) होत असून यामध्ये विहिरीत पडलेल्या सापाला वाचवताना एक व्यक्ती दिसून येत आहे. याबाबतचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनी दिलं आहे.

या व्हिडिओमध्ये दिसतंय, की या व्यक्तीनं साप विहिरीत पडल्याचं पाहिल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. त्यानंतर सापाच्या दिशेनं पोहत जात त्याने सापावर पाणी उडवत त्याला आपल्या दिशेनं आणलं. यामध्ये दुसरी आणखी एक व्यक्ती विहिरीच्या कठड्यावर उभी राहून साप पकडण्याच्या स्टिकने तो पकडण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी त्याच्या शेपटीला पकडून त्याला एका प्लॅस्टिकच्या बरणीत बंद करून ठेवलं. 4 मिनिटे 31 मिनिटांच्या या व्हिडिओत हा साप पकडण्यासाठी किती कष्ट करावे लागले हे दिसून येत आहे. हा व्हिडीओ साध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक जणांच्या प्रतिक्रिया येत असून आतापर्यंत 3 लाख वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.

नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. यामध्ये एकाने माणुसकीचं कार्य म्हटलं आहे. तर एकानं शाब्बास मित्रांनो, पण यासाठी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून बरोबर केलं नसल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर आणखी अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. याचबरोबर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं सापाला कोरड्या विहिरीतून बाहेर काढलं हे दिसून येत आहेत. यामध्ये एका पिशवीला विहिरीत सोडत त्याला एल पाईपच्या मदतीनं पॅक करण्यात आलं होतं. खूप दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर अखेर तो साप या पिशवीत गेल्याचं या व्हिडिओत दिसून येत आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 16, 2021, 3:21 PM IST

ताज्या बातम्या