• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • OMG! तोंड उघडताच बाहेर पडला भलामोठा कोळी; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

OMG! तोंड उघडताच बाहेर पडला भलामोठा कोळी; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

हॅलोवीनच्या निमित्ताने त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात दिसतं की त्यांच्या तोंडात एक कोळी असतो आणि तोंड उघडताच हा कोळी बाहेर येतो. व्हिडिओ इतका भयंकर आहे, की पाहूनच लोक घाबरत आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 31 ऑक्टोबर : जगात अनेक लोक असे असतात ज्यांना किड्यांची प्रचंड भीती वाटते. कोळीलादेखील अनेकजण घाबरतात. मात्र, अनेक लोक असाही दावा करतात की त्यांनी कोळी आवडतो. स्पायडर मॅन चित्रपट पाहून त्यांचं कोळीवरील प्रेम वाढलेलं आहे. मात्र, सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे (Shocking Video of Spider), जो पाहून कोळी आवडणाऱ्या लोकांनाही भीती वाटेल. यात एक व्यक्ती एका भल्यामोठ्या कोळीसोबत खेळताना दिसतो. मात्र, त्यापेक्षाही हैराण करणारी बाब म्हणजे हा कोळी त्याच्या तोंडातून बाहेर येतो (Tarantula Spider in Zoo Keeper's Mouth). झेब्र्यानं हरणाच्या पाडसावर केला भयंकर हल्ला, हृदय पिळवटणारा VIDEO व्हायरल होणारा हा व्हिडिओ अमेरिकेचे झू किपर जे ब्रीवर यांचा आहे. ते ‘द रेप्टाइल जू’ (The Reptile Zoo) चे मालक आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांची मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्यांना 50 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात. जे आपल्या अकाऊंटवरुन प्राण्यांसोबतच इतरही व्हिडिओ शेअर करत राहतात. या व्हिडिओंमधून त्यांचं प्राण्यांबद्दलचं प्रेम दिसतं. कधी विषारी सापांसोबतचे. कधी भयानक मगरीसोबतचे तर कधी मोठमोठ्या पालींसोबतचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. मात्र,सध्या त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये ते एका मोठ्या टॅरंट्यूला कोळीसोबत दिसत आहेत.
  हॅलोवीनच्या निमित्ताने त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात दिसतं की त्यांच्या तोंडात एक कोळी असतो आणि तोंड उघडताच हा कोळी बाहेर येतो. व्हिडिओ इतका भयंकर आहे, की पाहूनच लोक घाबरत आहेत. जे यांचे हावभाव पाहून असं जराही वाटत नाही, की त्यांना या कोळीची भीती वाटत आहे. लग्नाआधीच नवरदेवाला भेटण्यासाठी उतावळी झाली नवरी; सासूला पाठवला अजब मेसेज, VIDEO व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, हॅलोवीन आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील गोष्टीही भीतीदायक होत आहेत. विदेशांमध्ये हॅलोवीन आज म्हणजेच ३१ ऑक्टोबरला साजरा केला जात आहे. यादिवशी लोक अतिशय भीतीदायक मेकअप करून लोकांसमोर जातात. आपल्या पूर्वजांच्या आठवणीत हा दिवस साजरा केला जातो.
  Published by:Kiran Pharate
  First published: