मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हिरोगिरी करत स्वतःच मगरीच्या जबड्यात दिला हात, नको तो खेळ आला अंगाशी; अंगावर काटा आणणारा VIDEO

हिरोगिरी करत स्वतःच मगरीच्या जबड्यात दिला हात, नको तो खेळ आला अंगाशी; अंगावर काटा आणणारा VIDEO

मगरीच्या जबड्यात हात टाकताच तरुणाची भयंकर अवस्था

मगरीच्या जबड्यात हात टाकताच तरुणाची भयंकर अवस्था

ज्या मगरीच्या जबड्यातून भल्याभल्या प्राण्यांचीही सुटका होत नाही अशा मगरीच्या जबड्यात तरुणाने स्वतःहून हात टाकला.

    बँकॉक, 12 ऑगस्ट : 'स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देणं' हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकली असेल. सध्या सोशल मीडियावर याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मगरीसोबत स्टंट  करताना दिसतो. यादरम्यान असं काही घडतं की ते पाहून तिथे उपस्थित सर्वच घाबरले. या व्यक्तीने स्वतःतहून मगरीच्या जबड्यात आपला हात दिला आणि त्यानंतर त्याची अवस्था भयंकर झाली. धडकी भरवणारा हा व्हिडीओ आहे (Man hand in crocodile mouth). ज्या मगरीच्या जबड्यातून सिंहासारखा बलाढ्य प्राणीही वाचत नाही, अशा मगरीच्या जबड्यात ही व्यक्ती अगदी आरामात आपला संपूर्ण हात टाकतो. मगर हल्ला करण्यात अगदीच पटाईत आहे, सवयीप्रमाणे तिनं इथेही तसंच काहीसं केलं. काहीच सेकंदाच मगरीनं या व्यक्तीचा हात आपल्या जबड्यात पकडला. @TheFigen ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता हा तरुण मगर जबडा उघडून आहे. तिच्यासमोर एक तरुण उभा आहे. मोठी डेअरिंग करत तरुण आपला संपूर्ण हात मगरीच्या जबड्यात टाकतो. त्यानंतर मगर लगेच आपलं तोंड बंद करून घेते. तरुणाचा हात मगरीच्या जबड्यातच असतो. हे वाचा - VIDEO - शिंगावर घेऊन उडवत, आपटत, फरफटत नेलं; चवताळलेल्या बैलाचा वृद्धेवर भयंकर हल्ला भलतीच डेअरिंग दाखवण्यासाठी तरुण मगरीच्या तोंडात हात देतो आणि त्यानंतर त्याची सुटकेसाठी धडपड सुरू होते. त्यावेळी दोघंही एकमेकांना लपेटून गोलगोल फिरतात. डेली मेलच्या रिपोर्टनुसार ही घटना 2017 सालातील आहे. थायलँडच्या फुकेटमधील क्रोकोडाइल फार्ममशील हे दृश्य आहे. ही व्यक्ती मगरीच्या पिंजऱ्यात आहे. ती त्याच प्राणीसंग्रहायलात काम करते. मगरींना खायला घालते. पिंजऱ्याबाहेर लोक या व्यक्तीला आणि मगरीला पाहत आहेत. त्यांच्यासमोर हिरोगिरी करण्याच्या नादात या व्यक्तीने आपला हात बिनधास्तपणे मगरीला दिला आणि त्याची अवस्था भयंकर झाली. हे वाचा - म्हशीसमोर ठुमके पडले भारी; डान्स करणाऱ्या तरुणीसोबत काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO या व्यक्तीचं नेमकं काय झालं ते या व्हिडीओत दिसत नाही. पण डेली मेलच्या रिपोर्टमध्ये हा पूर्ण व्हिडीओ देण्यात आला आहे. ज्यात बऱ्याच प्रयत्नानंतर या व्यक्तीचा हात सुटल्याचं दिसतं.  माहितीनुसार सुदैवाने या व्यक्तीचा जीव वाचला पण त्याचा हात राहिला नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या