Home /News /viral /

कसं शक्य आहे? धगधगत्या मेटल लिक्विडमध्ये हात टाकूनही काहीच झालं नाही; VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

कसं शक्य आहे? धगधगत्या मेटल लिक्विडमध्ये हात टाकूनही काहीच झालं नाही; VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

ज्वालामुखीसारख्या लिक्विड मेटलमध्ये त्याने हात टाकला त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे.

    मुंबई, 30 मार्च : तुम्ही कधी पेटत्या दिव्याला किंवा गॅसच्या गरम शेगडीला चुकून हात लावला आहे का? तेव्हा किती चटका लागतो याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. त्यामुळे गरम धातूला हात लावण्याची हिंमत आपली नक्कीच होणार नाही. असा धातू इतका तापवला की तो फक्त गरमच नव्हे तर त्याचं लिक्विड बनलं आहे तर मग तो कोणत्या ज्वालामुखीपेक्षा कमी नाही. अशाच धगधगत्या मेटलमध्ये एका व्यक्तीने हात टाकला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Man puts hand in boiling metal liquid). उकळत्या पाण्यातही हात टाकण्याचा विचार आपण करणार नाही. या व्यक्तीने तर चक्क धगधगत्या लिक्विड मेटलमध्ये हात टाकला आहे.  लिक्विड मेटलमध्ये त्याचं हात टाकणं जितकं धक्कादायक आहे, त्यापेक्षाही जास्त धक्कादायक त्यानंतर जे घडलं ते आहे. व्हिडीओत पाहू शकता उकळत्या लिक्विड मेटलची धार वाहते आहे. एक व्यक्ती तिथं येते. ती आपल्या हातातील ग्लोव्ह्ज काढून टाकते आणि आपला हात त्या धारेत टाकते. सुपरहिरोसारखी ती गरम लिक्विड धातूवर ही व्यक्ती हात मारताना दिसते. हे वाचा - जंगलाच्या राजासमोर छाती ताणून उभा राहिला तरुण; सिंहांसोबत सेल्फी काढायला गेला आणि...; Shocking Video Viral त्यानंतर ही व्यक्ती आपला हात कॅमेऱ्यासमोर दाखवते. या व्यक्तीच्या हाताची बोटं काळी झालेली दिसतात पण इतक्या गरम लिक्विड धातूमध्ये हात टाकल्यानंतर हाताची जी भय़ंकर अवस्था होणं आपल्याला अपेक्षित आहेत, तशी अवस्था या व्यक्तीच्या हाताची झाली नाही. त्याच्या हाताला तसं काहीच झालेलं नाही आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटिझन्स हैराण झाले आहेत. तर काहींनी यामागील लॉजिक सांगितलं आहे. काही युझर्सनी लोकांना फसवण्याची ही एक टेक्निक असून  याला स्मार्ट पद्धतीने एडिट केल्याचं म्हटलं आहे. हे वाचा - काळजाचा ठोका चुकवेल हे दृश्य; कधीच पाहिला नसेल इतका खतरनाक Bike Stunt Video @gunsnrosesgirl3 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ म्हणजे लेडिनफ्रॉस्ट इफेक्टचं उत्तम उदाहरण आहे. त्याच्या त्वचेवरील मॉईश्चर लगेच बॉईल होतं, ज्यामुळे थोड्या कालावधीसाठी हातेवर वाफेचा एक थर तयार होऊन थोड्या कालावधीसाठी उष्णतारोधकाचं काम करतो. ज्यामुळे या व्यक्तीचा हात आणि वितळणाऱ्या मेटलमध्ये तात्पुरता अडथळा बनतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking video viral, Viral, Viral videos

    पुढील बातम्या