मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - ड्रायव्हरसकट बुडत होती कार; बचावासाठी व्यक्तीने पाण्यात उडी मारली अखेर...; असा झाला शेवट

VIDEO - ड्रायव्हरसकट बुडत होती कार; बचावासाठी व्यक्तीने पाण्यात उडी मारली अखेर...; असा झाला शेवट

ड्रायव्हरसह कार पाण्यात बुडताना पाहून व्यक्तीने कोणताही विचार न करता थेट पाण्यात उडी मारली.

ड्रायव्हरसह कार पाण्यात बुडताना पाहून व्यक्तीने कोणताही विचार न करता थेट पाण्यात उडी मारली.

ड्रायव्हरसह कार पाण्यात बुडताना पाहून व्यक्तीने कोणताही विचार न करता थेट पाण्यात उडी मारली.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 31 मे : बरेच लोक इतरांना संकटात पाहताच त्यांच्या मदतीसाठी धावून जातात. अशावेळी तेसुद्धा संकटात अडकण्याची शक्यता असते.  असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात पाण्यात बुडणाऱ्या एका कारला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी एका व्यक्तीने पाण्यात उडी मारली. शेवटपर्यंत त्याने प्रयत्न केले त्याचा परिणाम काय झाला ते तुम्हीच पाहा (Man pulled out car from water). नदीकिनारी एक कार अडकली आहे. कारचा मागील भाग पाण्यात आणि पुढील भाग जमिनीवर आहे. दोन व्यक्ती ही कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चाकाच्या खाली आधार देत दोघंही कार हटवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी कारच्या पुढील चाकांना आधार देत कार थोडी मागे ढकलण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला ही कार बाहेर पडणारच नाही असं वाटतं. त्यानंतर कार बाहेर तर येते पण ती पाण्यात जाऊन अडकते किंबहुना ती बुडूच लागते. हे वाचा - OMG! हे कसं शक्य आहे? महिलेचा चमत्कारिक Pregnancy Video पाहून चक्रावले नेटिझन्स कार ड्रायव्हरसकट पाण्यात जाते. ड्रायव्हर कार पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो. पण कार काही केल्या बाहेर येत नाही. उलट ती पाण्यात आणखी बुडते. निम्मी कार तर पाण्यात बुडालेलीच असते. आता ही कार पूर्णपणे पाण्यातच जाणार  असं वाटत असताना ही व्यक्ती मात्र हार मानत नाही. ती कारला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी मारते. आपल्या हातांनी ती कारला ढकलताना दिसते. कार हातांनी किनाऱ्याच्या दिशेने ढकलते. त्यानंतर दुसरी व्यक्तीही पाण्यात जाण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत पहिली व्यक्ती ती कार पाण्यातून बाहेर काढण्यात यशस्वी होते.  कार किनाऱ्यावर येताच कारचा ड्रायव्हर ती चालवून पुढे घेऊन जातो.  सर्वजण या कारला बाहेर काढण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतंच. प्रयत्न केल्यास अशक्य गोष्टही शक्य होते, हेच या व्हिडीओतून दिसून येतं. हे वाचा - उंच टेकडीवर उभा आहे विमान; फोटोग्राफरने पंखावर चालत दाखवलं मनमोहक दृश्य, पुन्हा पुन्हा पाहाल हा VIDEO @GTA___Memes ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हार मानू नका असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या तरुणाच्या हिमतीचं आणि हुशारीचं कौतुक अनेकांनी केलं आहे.
First published:

Tags: Car, Viral, Viral videos

पुढील बातम्या