मुंबई, 11 ऑगस्ट : काही तरी डेअरिंगबाज करण्याच्या नादात आपण अनेकदा आपण स्वतःलाच संकटात टाकतो. असंच घडलं या व्यक्तीसोबत. ज्याने एका हाताने एका फटक्यात भिंत (Man trying to pull down wall) पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न यशस्वीही झाला. पण त्याने भिंत पाडली त्याच्या दुसऱ्याच क्षणी असं काहीतरी घडलं की पाहून सुरुवातीला काळजाचा ठोकाच चुकेल (Shocking video). पण नंतर मात्र हसू आवरणार नाही.
भिंतीवर उभं राहून भिंतीसोबत स्टंट करण्याच्या नादात या व्यक्तीने असं काही केलं ज्याचा भलताच परिणाम झाला. आपल्यासोबत असंकाही होईल याची कल्पनाही या व्यक्तीने केली नसावी.
— Idiots Fighting Things (@IdiotsFightingT) August 10, 2021
व्हिडीओत (Viral video) पाहू शकता एक व्यक्ती एका तुटलेल्या भिंतीवर (Wall fall on man) उभी आहे. तिथं उभी राहून ती दुसरी भिंत पाडण्याचा प्रयत्न करते आहे.
हे वाचा - जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa च्या टॉपवर उभी तरुणी; धडकी भरवणारा VIDEO
ती आपल्या हातानेच हा कारनामा करते. भिंतीवर हाताने ठोकते आणि एका फटक्यातच भिंत कोसळते. पण दुसऱ्याच क्षणी दुसऱ्या बाजूची भिंत त्या व्यक्तीवर पडते आणि तो ढिगाऱ्यात कोसळतो. व्हिडीओ पाहातच सुरुवातीला धडकीच बसते. या व्यक्तीला काही झालं तर नाही ना, अशी भीती वाटते. पण मग ढिगाऱ्यातून ती व्यक्ती उभी रागते. सुदैवाने त्या व्यक्तीला काहीही झालं नाही. मग मात्र आपल्याला हसू आवरत नाही.
हे वाचा - VIDEO - थेट म्हशीलाच उचलायला गेला पण...; स्वतःला बाहुबली समजणाऱ्या तरुणाची फजिती
Idiots Fighting Things ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी त्याच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Viral, Viral videos