मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तरुणाचा ट्रेन ड्रायव्हर महिलेवर जडला जीव! स्टेशनवर केलेल्या प्रपोजचा VIDEO VIRAL

तरुणाचा ट्रेन ड्रायव्हर महिलेवर जडला जीव! स्टेशनवर केलेल्या प्रपोजचा VIDEO VIRAL

हा VIDEO पाहून तुम्ही म्हणाल क्या बात है! तरुणानं अनोख्या अंदाजात केलं प्रपोज

हा VIDEO पाहून तुम्ही म्हणाल क्या बात है! तरुणानं अनोख्या अंदाजात केलं प्रपोज

हा VIDEO पाहून तुम्ही म्हणाल क्या बात है! तरुणानं अनोख्या अंदाजात केलं प्रपोज

  • Published by:  Kranti Kanetkar
तेहरान, 20 डिसेंबर : आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी तरुण अनेक भन्नाट गोष्टी करत असतात. कधी भर चौकात सजावट करून तर कधी अजब फंडे वापरून प्रपोज केलं जातं. पण एका प्रपोजची जगभरात चर्चा होत आहे. याचं कारण पण तेवढंच खास आहे. ट्रेन चालक असलेल्या महिलेला एका तरुणानं भर स्टेशनवर खूप भन्नाट प्रपोज केलं आहे. त्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तरुणानं स्टेशनवर माझ्याशी लग्न करशील का? असा बोर्ड ट्रेन थांबते तिथे लावला आहे. हातात फुलांचा गुच्छ घेऊन हा तरुण उभा आहे आणि तरुणीची वाट पाहात आहे. तरुणी 13 तासांची शिफ्ट संपवून स्टेशनवर गाडी लावते. डोअर उघडून खाली उतरते आणि तिला हे मोठं सरप्राइज मिळतं. तरुण तिला गुडघ्यावर बसून प्रपोज करतो. हे वाचा-खऱ्या 'देव माणूस' खुनी डॉक्टराबद्दल खुलासा, साक्षीदाराने कोर्टात दिली माहिती ट्रेन चालक असलेल्या महिलेला भन्नाट सरप्राइज मिळत आणि ती खूश होते. दोघंही एकमेकांना मिठी मारतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. युझर्सनी या दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. या तरुणानं प्रेयसीला ज्या पद्धतीने प्रपोज केलं तो क्षण अविस्मरणीय ठरला आहे. या प्रपोजची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. आयरिश रेल्वेनं हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 70 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक युझर्सनी त्यांचं अभिनंदन देखील केलं आहे. या व्हिडीओवर सोशल मीडियावर खूप लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
First published:

Tags: Viral video.

पुढील बातम्या