Home /News /viral /

VIDEO: गर्लफ्रेंडच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात गेला अन् तिथेच केलं लग्नासाठी प्रपोज, पुढे काय घडलं पाहा

VIDEO: गर्लफ्रेंडच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात गेला अन् तिथेच केलं लग्नासाठी प्रपोज, पुढे काय घडलं पाहा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लोक एखाद्याला प्रपोज करण्यासाठी खूप छान प्लॅन करतात आणि आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी काहीतरी वेगळं करतात. परंतु या व्यक्तीने प्रपोज करण्यासाठी अतिशय चुकीची वेळ आणि जागा निवडली.

    नवी दिल्ली 13 मे : कधीकधी लोक आपल्या लव्ह लाईफबद्दल (Love Life) इतके उत्साहित होतात की ते परिस्थिती जाणून न घेता विचित्र गोष्टी करतात. कोणत्याही अंत्ययात्रेत उदास वातावरण असतं, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीत मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी लोक प्रार्थना करतात. मात्र, अंत्यसंस्कार सुरु असतानाच एका व्यक्तीचं प्रेम जागं झालं आणि तो चक्क तिथेच मृताच्या मुलीला प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसला. हे पाहून उपस्थित सगळेच शॉक झाले. यादरम्यान त्याची गर्लफ्रेंड रडत होती. मात्र प्रियकर आपल्याच नादात होता आणि त्याला आपल्या प्रेयसीला अंगठी घालायची होती (Man Proposes Girlfriend at her Father's Funeral). Shocking! जोशाजोशात गेला जीव; बाथरूममध्ये शारीरिक संबंधादरम्यान महिलेचा मृत्यू लोक एखाद्याला प्रपोज करण्यासाठी खूप छान प्लॅन करतात आणि आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी काहीतरी वेगळं करतात. परंतु या व्यक्तीने प्रपोज करण्यासाठी अतिशय चुकीची वेळ आणि जागा निवडली. दक्षिण आफ्रिकेतील एका धर्मगुरूने आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात प्रपोज केलं. M.Mojela ने TikTok वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, हा प्रियकर एका गुडघ्यावर बसल्याचं दिसतं. या व्यक्तीने दक्षिण आफ्रिकेच्या लिम्पोपो प्रांतात अंत्यसंस्काराच्या वेळी प्रेयसीला लग्नासाठी मागणी घातली. डान्स करण्यासाठी महिलेला हात पकडून स्टेजवर खेचलं अन्...; लग्नातच पाहुण्यांची तुफान हाणामारी, Video Viral व्हिडिओ क्लिपच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे 'अंत्यसंस्काराच्या वेळी मृताच्या मुलीला प्रपोज केलं आणि अश्रू पुसले.' व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला महिलेच्या वडिलांची शवपेटी दिसत आहे. चर्चच्या पादरीने अजिबात कशाचीही पर्वा न करता आपल्या गर्लफ्रेंडच्या बोटात अंगठी घालायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, 'हे चुकीचं आहे. आपण कोणत्याही प्रकारे या गोष्टीचं समर्थन करू शकत नाही. मला वाटतंय, की त्याने योग्य वेळेची वाट पाहायला हवी होती. एखादा व्यक्ती इतका दुःखात असताना तुम्ही आनंद साजरा कसा करू शकता'.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Marriage, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या