• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Shocking! जो उंदीर वाटला तो निघाला पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट; बाटली पाहून तरुण हादरलाच

Shocking! जो उंदीर वाटला तो निघाला पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट; बाटली पाहून तरुण हादरलाच

घरासमोरील बागेची साफसफाई करताना एक बंद बाटली सापडली.

 • Share this:
  अर्जेंटिना, 16 सप्टेंबर :  घर किंवा घराबाहेर साफसफाई करताना काही ना काही सापडतंच. कधी आपली एखादी हरवलेली वस्तू सापडते किंवा कधी अनपेक्षित काही तरी सापडतं. अशीच घराबाहेर साफसफाई करणाऱ्या तरुणाला असं काही सापडलं ज्यामुळे त्याला धक्काच बसला. या व्यक्तीला घराच्या बागेत एका बाटलीत चक्क पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट सापडला (Private Part In Bottle). अर्जेंटिनाच्या (Argentina) बॅकर्समध्ये राहणारी व्यक्ती बागेत साफसफाई करत होती. तेव्हा त्या व्यक्तीला बागेत एक बंद बाटली सापडली, ज्यामध्ये पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट होता. हे पाहून ती व्यक्ती हादरलीच. घराजवळील बागेत गवत बरंच वाढलं होतं, शिवाय दुर्गंधही येत होता. तिथं एखादा उंदीर सडला असावा असं त्या व्यक्तीला वाटलं. त्यामुळे बागेची साफसफाई करायली घेतली. हे वाचा - वर्षभर SEX न करताच प्रेग्नेंट राहिली तरुणी? पोटदुखीनंतर डॉक्टरांनी दिला रिपोर्ट बागेत वाढलेलं गवत कापत असताना  त्या व्यक्तीला एक बाटली सापडली. या बाटलीतूनच दुर्गंध येत होता. या बाटलीत चक्क पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट होता. कापलेली पेनिस या बाटलीत होती. लोकल रिपोर्टनुसार साफसफाई दरम्यान ही बाटली तुटली आणि त्यातील दुर्गंध सर्वत्र पसरला. व्यक्तीने लगेच याची माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी आता फॉरेन्सिक तपासणी सुरू केला आहे. हे वाचा - एका ग्लासमुळे फुटलं नवरदेवाचं बिंग, लग्नातच दिसलं त्याचं खरं रूप; VIDEO VIRAL हा मानवी प्रायव्हेट पार्ट कापून बाटलीत का ठेवण्यात आला, याची माहिती मिळाली नाही. काही लोकांच्या मते, हा काळ्या जादूचा प्रकार असावा. दरम्यान पोलीस या परिसरातील रुग्णालयातही चौकशी करत आहे. तिथं एखादी व्यक्ती प्रायव्हेट पार्टच्या उपचारासाठी आली असावी आणि तिचा हा प्रायव्हेट पार्ट असावा, असा संशय त्यांना आहे.
  Published by:Priya Lad
  First published: