मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Yuks! जिलेबीवर घातला कांदा, दही आणि मसाला; फोटो पाहूनच सुरू झाली मळमळ

Yuks! जिलेबीवर घातला कांदा, दही आणि मसाला; फोटो पाहूनच सुरू झाली मळमळ

जिलेबीत जर कुणी कांदा आणि मसाला घालून दिला, तर किती जिलेबीप्रेमींना किती राग येऊ शकतो, याची प्रचिती नुकत्यात एका फोटोवरून आली आहे.

जिलेबीत जर कुणी कांदा आणि मसाला घालून दिला, तर किती जिलेबीप्रेमींना किती राग येऊ शकतो, याची प्रचिती नुकत्यात एका फोटोवरून आली आहे.

जिलेबीत जर कुणी कांदा आणि मसाला घालून दिला, तर किती जिलेबीप्रेमींना किती राग येऊ शकतो, याची प्रचिती नुकत्यात एका फोटोवरून आली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 19 डिसेंबर: जिलेबीवर (Jalebi) जर कुणी कांदा, दही आणि मसाला (Onion, Curds and Spices) घालून तुम्हाला खायला दिलं, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? हा काय विचित्र प्रकार आहे, असाच प्रश्न कुणालाही पडेल. गेल्या काही दिवसांपासून ट्विटर आणि (Social Media) इतर सोशल मीडियावर चित्रविचित्र रेसिपींना (Weird recipes) अक्षरशः ऊत आला आहे. कुठल्याही पदार्थाचा मूळ गुणधर्म बदलून त्याच्यासोबत वाट्टेल त्या पदार्थाचं कॉम्बिनेशन करायचं आणि तो पदार्थ सोशल मीडियावर अपलोड करायचा, असा ट्रेंडच तयार होऊ लागला आहे. लोक शिव्या देत का असेना, अशा पदार्थांना पाहतात आणि व्हिडिओ व्हायरल होतो. सध्यादेखील असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजब कॉम्बिनेशन

जिलेबी हा अनेकांना आवडता पदार्थ असतो. गोड आणि खुशखुशीत जिलेबीची आठवण आली तरी तोंडाला पाणी सुटतं. मात्र या जिलेबीसोबत जर वाट्टेल ते कॉम्बिनेशन केलं, तर मात्र त्या पदार्थाची पूर्ण रयाच निघून जाते. नुकत्याच ट्विटरवर अपलोड झालेल्या जिलेबीच्या एका फोटोनं पदार्थांच्या विक्षिप्तपणाचे सगळे रेकॉर्डच तोडून टाकले आहेत.

अशी जिलेबी कधीच खाल्ली नसेल

व्हिडिओत दिसणाऱ्या प्लेटमध्ये तीन जिलेब्या ठेवल्या आहेत. त्यावर दही टाकण्यात आलं आहे आणि वरून शेव, पापडी टाकून त्याला सजवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जिलेबीसोबत कांदा पाहून तर अनेकांच्या पोटातच कळ आली आहे. कुठल्या पदार्थाबरोबर काय खावं, हे प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीलादेखील समजत असतं. एखादी गोष्ट खाण्याअगोदर त्या कॉम्बिनेशनच्या कल्पनेनंही मळमळायला सुरुवात होऊ शकते, याचा अनुभव हा फोटो पाहणारे युजर्स घेत आहेत.

हे वाचा-Tiger Woods पेक्षा जास्त फॉलोअर्स असणारी Gold Player, लूक पाहून भडकतात लोक

लोकांना आला राग

हा फोटो पाहून लोकांना राग आला आहे. त्यात हा फोटो अपलोड करणाऱ्याने विकेंडनिमित्त माझ्याकडून सर्वांना भेट, असं म्हटलं आहे. त्यामुळे तर जिलेबीप्रेमी अधिकच खवळले आहेत. एखाद्याला जिलेबी खायची इच्छा असेल, तर हा फोटो पाहून तीदेखील मरून जाईल, असं एकानं म्हटलं आहे, तर या पापाची शिक्षा कुठे फेडशील, असा सवाल दुसऱ्याने केला आहे.

First published:

Tags: Recipie, Twitter, Viral photo