Home /News /viral /

खाणं द्यायला म्हणून गाडीची खिडकी उघडली, भुकेल्या वाघाने झडप घातली अन्...; थरारक VIDEO

खाणं द्यायला म्हणून गाडीची खिडकी उघडली, भुकेल्या वाघाने झडप घातली अन्...; थरारक VIDEO

एका व्यक्तीने भुकेल्या वाघाला मांसाचा गोळा दाखवत मृत्यूलाच आमंत्रण दिलं. पुढे जे घडलं ते धक्कादायक.

  मुंबई, 04 ऑगस्ट : सिंह, बिबट्या, वाघ अशा प्राण्यांना पाहण्याची जितकी उत्सुकता असते त्यापेक्षा किती तरी भीती त्यांना पाहिल्यानंतर वाटते. असे प्राणी समोर आले की घाम फुटतो. मग मुद्दामहून या प्राण्यांना पाहण्यासाठी आपण नॅशनल पार्क, जंगल सफारीवर गेलो आणि ते दिसले तरी त्यांना आपण स्वतःहून जवळ नक्कीच बोलावणार नाही. पण एका व्यक्तीने तशी हिंमत केली. त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून तुम्हाला धडकीच भरेल. वाघ ज्याला फक्त शिकार करणं, आपली भूक भागवणं इतकंच माहिती. अशाच भुकेल्या वाघाशी पंगा घेणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. एका व्यक्तीने अशाच भुकेल्या व्यक्तीला आपल्याजवळ बोलावलं. खाणं द्यायला म्हणून गाडीत बसलेल्या या व्यक्तीने गाडीची खिडकी उघडली. पुढे काय घडलं ते तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी पाहा. हे वाचा - बापरे! चिमुकलीच्या अंगावर चढला खतरनाक साप आणि...; काळजाचं पाणी पाणी करणारा VIDEO व्हिडीओत पाहू शकता वाघ दिसताच गाडी थांबवली जाते. वाघ त्या गाडीच्या दिशेने येतो. वाघाला येताना पाहून गाडीतील व्यक्ती गाडीची खिडकी उघडते. ती त्या वाघाला खाणं द्यायला जाते. व्यक्तीच्या हातात मांस आहे. ते पाहताच भुकेला वाघ वेगाने गाडीजवळ येतो आणि खिडकीवर झडप घालतो. त्याचक्षणी आपल्याला धडकी भरते.
  व्यक्तीच्या हातातील मांस तो एका फटक्यात संपवतो. आता हा वाघ त्या व्यक्तीलाही काही हानी पोहोचवतो की काय, अशीच भीती वाटते. पण सुदैवाने या व्हिडीओत तरी वाघ या व्यक्तीला हानी पोहोचवत असल्याचं दिसत नाही. पण तो काहीही करू शकला असता. मांसाचा गोळा खाल्ल्यानंतर त्याने खाणं देणाऱ्या या व्यक्तीलाही आपलं शिकार बनवलं असतं. पण या व्यक्तीचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तसं काही घडलं नाही. हे वाचा - बिबट्या आला रे आला! गावात घुसून वाटेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला...; थरकाप उडवणारा VIDEO the_amazing_tigers इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी या व्यक्तीचा अति आत्मविश्वास मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. त्याचं हे कृत्य जीवघेणंही ठरलं असतं अशी प्रतिक्रिया अनेक युझर्सनी दिली आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Tiger, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या