टोकियो, 27 एप्रिल : काही दिवसांपूर्वी एका डॉलशी लग्न करणारा बॉडीबिल्डर चर्चेत आला आहे. आता एक व्यक्ती या बॉडीबिल्डरच्याही पुढे गेली आहे. तिने चक्क एका फिक्शन कॅरेक्टरच्या होलोग्रामशी लग्न केलं आहे. पण आता होलोग्राम पत्नीमुळे त्याच्यासमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. जिच्या प्रेमात पडून, जिच्याशी लग्न केलं तिच्यामुळे आता भलताच वांदा झाला आहे
(Man marry with Fictional character).
जपानमधील 38 वर्षांचा अकिहिको कोंडो (Akihiko Kondo). 16 वर्षांची फिक्शनल पॉपस्टार हत्सुन मिकूच्या प्रेमात पडला. हे एक कॉम्प्युटर क्रिएट फिक्शनल कॅरेक्टर आहे, जे प्रत्यक्ष या जगात नाहीच. पण म्हणतात ना प्रेम आंधळं असतं. अकिहिकोनेही मिकूच्या प्रेमात असाच वेडा झाला. 2008 साली तो तिच्या प्रेमात पडला.
हे वाचा - मोठ्या तोऱ्यात एकाच मंडपात एकाच वेळी 9 बायकांशी केलं लग्न; महिनाभरातच...
गेटबॉक्स नावाच्या एका मशीनमार्फत फिक्शनल कॅरेक्टरच्या होलोग्राम म्हणजे 3-डी रुपाशी बोलता येतं. याच मशीनच्या माध्यमातून कोंडो 2017 साली मिकुशी पहिल्यांदा बोलला तेव्हा त्याला खूप बरं वाटलं. त्यानंतर 1300 डॉलर्स खर्च करून तो हे डिव्हाइस आपल्या घरी घेऊन आला. 2018 साली त्याने तिच्याशी लग्नही केलं.
पण आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. ज्या गेटबॉक्सने कोंडो मिकूशी बोलायचे त्याची सर्व्हिसच बंद झाली. त्यामुळे तो आणि मिकू एकमेंकासोबत आता बोलू शकत नाही. तो आपल्या व्हर्चुअल पार्टनरसोबत राहतो तो तिच्याशी बोलूच शकत नसल्याने जे बाँड माणसांशी असतं ते तो डेव्हलप करू शकला नाही.
हे वाचा - चक्क एका मांजरीलाच बनवलं शहराचं महापौर; खास आहे कारण
असं असलं तरी त्याचं तिच्यावरील प्रेम कमी झालं नाही. आपल्याला कोणत्याच माणसाशी रिलेशनशिपमध्ये राहायचं नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. खरंतर कोंडो हा एक फिक्टोसेक्शुअल आहे. हे लोक सेक्शुअली काल्पनिक कॅरेक्टरकडे आकर्षित होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.