• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पहिल्या बायकोसमोरच त्यानं 9 महिलांसोबत बांधली लग्नगाठ; पत्नीची प्रतिक्रिया ऐकून व्हाल थक्क

पहिल्या बायकोसमोरच त्यानं 9 महिलांसोबत बांधली लग्नगाठ; पत्नीची प्रतिक्रिया ऐकून व्हाल थक्क

या अजब लग्नाआधी युवकानं लुआना कजाकीसोबत लग्न केलं होतं. तिच्यासोबत तो नुकतंच हनिमूनला जाऊन परतला आहे. मात्र यानंतर या जोडप्याने असा निर्णय घेतला की आर्थर इतरही महिलांसोबत लग्न करेल

 • Share this:
  नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : भारतात सध्या लग्नसमारंभाचा सीझन (Wedding Season 2021) सुरू आहे. तुम्हाला सगळीकडेच बँड-बाजाचे आवाज ऐकू येतील. भारतात लग्न अतिशय प्लॅनिंगने केलं जातं. भारतात हिंदू धर्मात एक पत्नी असताना दुसरीसोबत लग्न करणं बेकायदेशीर आहे. मात्र, सध्या एक व्यक्ती चांगलाच चर्चेत आहे. या तरुणाने एकाच मंडपात 9 महिलांसोबत लग्नगाठ बांधली (Man Married with 9 Women) आहे. या अनोख्या लग्नाचे (Weird Wedding) फोटो व्हायरल झाले आहेत. हे अजब लग्न ब्राझीलच्या साउ पाउलो (Sao Paulo) मध्ये झालं आहे. इथे एका चर्चमध्ये पादरींच्या उपस्थितीत आर्थरने 9 महिलांसोबत लग्नगाठ बांधली. या ब्राझिलियन मॉडेलनं लोकांना मोफत प्रेम देण्यासाठी असं केलं आहे. या अजब लग्नाआधी त्याने लुआना कजाकीसोबत लग्न केलं होतं. तिच्यासोबत तो नुकतंच हनिमूनला जाऊन परतला आहे. मात्र हनिमूनवरुन परतताच या जोडप्याने असा निर्णय घेतला की आर्थर इतरही अनेक महिलांसोबत लग्न करेल. यानंतर दोघांनी असंच केलं. आर्थरनं नुकतंच एकसोबतच ९ महिलांसोबत लग्न केलं आहे. पतीनं केलेल्या या ९ लग्नांबद्दल त्याच्या पहिल्या पत्नीला काहीही तक्रार नाही. तिनं स्वतःच या लग्नसमारंभाला हजेरी लावली. आर्थरचं असं म्हणणं आहे, की प्रेम ही अशी गोष्ट आहे जी मोफत मिळते. त्यामुळे ही वाटायला हवी. प्रेम एकाच व्यक्तीपुरतं मर्यादित नसावं. हे कपल लॉकडाऊनच्या काळात अचानक चर्चेत आलं. जेव्हा त्यांनी अॅडल्ट साईट ओनलीफॅन्सवर आपलं अकाऊंट बनवून लाखो रूपये कमवण्यास सुरुवात केली. या कपलनं खुलासा केला की ते इतरांना सेक्ससाठी इन्सपायर करून पैसे कमवतात. आता या अनोख्या लग्नामुळे हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: