मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वाहतूक नियम मोडल्याचे शेकडो गुन्हे स्वत:च्या अंगावर घेते ही व्यक्ती; यासाठी आकारते भरमसाठ फी

वाहतूक नियम मोडल्याचे शेकडो गुन्हे स्वत:च्या अंगावर घेते ही व्यक्ती; यासाठी आकारते भरमसाठ फी

इतरांच्या चुका स्वत:च्या अंगावर घेणाऱ्या व्यक्तीला नुकतंच स्पॅनिश अधिकाऱ्यांनी (Spanish Officers) शोधून काढलं आहे. या व्यक्तीनं शेकडो लोकांच्या गाडी चालवण्याच्या चुका (Driving Mistakes) स्वत:वर घेतल्या आहेत.

मुंबई : दैनंदिन आयुष्यात असे अनेक प्रसंग उद्भवतात ज्यात लोकांच्या चुकांमुळे (Mistakes) आपल्याला शिक्षा होत असते. कुटुंबात किंवा ऑफिसात झालेली चूक एकमेकांवर टाकून मोकळी होणारी मंडळीही खूप पाहायला मिळतात. पण एक अशी व्यक्ती आहे जी इतरांच्या चुका स्वत:च्या अंगावर घेते. तशी सवयच जणू त्या व्यक्तीला लागलेली आहे. विशेष म्हणजे कुठलं समाजकार्य (Social Service) किंवा उदार मनाने हे कार्य म्हणून हे केलं जातं नसून, त्या मोबदल्यात ती व्यक्ती पैसे आकारते. इतरांच्या चुका स्वत:च्या अंगावर घेणाऱ्या व्यक्तीला नुकतंच स्पॅनिश अधिकाऱ्यांनी (Spanish Officers) शोधून काढलं आहे. या व्यक्तीनं शेकडो लोकांच्या गाडी चालवण्याच्या चुका (Driving Mistakes) स्वत:वर घेतल्या आहेत. यासाठी त्यानं समोरील व्यक्तीकडून शुल्कही घेतलंय. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे, ही व्यक्ती इतरांच्या चुका स्वत:वर घेण्यासंदर्भात मनोरंजक पद्धतीने त्याची जाहिरातही करत असल्याचं बॅलेरिक बेटावरील (Balearic Islands) एका सिव्हिल गार्डनं सांगितलयं. इतरांच्या चुका स्वत:वर घेण्याची नोकरी इतरांच्या चुका स्वत:वर घेणाऱ्या व्यक्तीचं नाव अधिकाऱ्यांनी जाहीर तर केलेलं नाही. परंतु ती व्यक्ती अर्मेनियाची रहिवासी आहे. या व्यक्तीनं आजवर अनेक अनोखळी व्यक्तीचे ड्रायव्हिंगसंबंधी गुन्हे स्वत:वर घेतले आहेत. बहुतांशी व्यक्ती स्वत:चं ड्रायव्हिंग रेकॉर्ड स्वच्छ ठेवणं व दंड (Challan) टाळण्यासाठी संबंधित व्यक्तीची सेवा (Service) घेतात. या सेवेच्या मोबादल्यात 75 ते 200 युरो म्हणजे 6,000 ते 15,000 रुपयांपर्यंत दंड देण्याची तयारी दर्शवतात. सिव्हिल गार्डनं दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने 2021 च्या दरम्यान हे काम सुरू केलं. ड्रायव्हिंग गुन्ह्यांसंदर्भात हजर होताना दरवेळी ही व्यक्ती ज्या वाहनाची नोंदणी (Vehicle Registration) स्वत:च्या नावावर नाही असे वाहन घेऊन येत असल्याचं सिव्हिल ट्राफिक गार्डचं म्हणणं आहे. वाहनं महिलांच्या नावावर, चलन व्यक्तीनं भरलं एकदा तर 800 किलोमीटर अंतरावर 2 वेळा वाहतूक नियम (Traffic Rules) मोडले गेले. याचा सखोल तपास केला गेला तेव्हा वाहन महिलांच्या नावावर होतं. पण त्या व्यक्तीनं चलन स्वत:च्या नावावर घेतलं. त्याचं स्वत:चं ड्रायव्हिंग लायसन्स रद्दही झालं आहे. हा गुन्हा त्या व्यक्तीनं आपल्या नावावर घेतल्यानं ज्याचं वाहन आहे त्यावर निश्चितच कारवाई होत नव्हती. आतापर्यंत स्पेनमध्ये एकूण 91 वाहनधारकांचे वाहतुकीचे नियम मोडल्याचे गुन्हे या व्यक्तीने स्वत:च्या नावावर घेऊन लाखो रुपयांची कमाई केली आहे. स्पेनमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्याची शिक्षा पॉइंटसमध्ये असल्यानं स्वत:चे पॉइंटस् वाचवण्यासाठी लोक त्या व्यक्तीकडून सेवा घेत होते.
First published:

पुढील बातम्या