Home /News /viral /

शेतकऱ्यानं केली कमाल; एकाच फांदीवर 839 टोमॅटोचं उत्पादन घेत रचला वर्ल्ड रेकॉर्ड, कसं झालं शक्य?

शेतकऱ्यानं केली कमाल; एकाच फांदीवर 839 टोमॅटोचं उत्पादन घेत रचला वर्ल्ड रेकॉर्ड, कसं झालं शक्य?

डगलस यांनी आपल्या फार्ममध्ये लावलेल्या टोमॅटोच्या एका फांदीवरुनच तब्बल 839 तोडले, हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही हैराण झाले.

    नवी दिल्ली 19 सप्टेंबर : प्रत्येक शेतकरी हा आपल्या पद्धतीनं शेती (Agriculture) करत असतो. एखाद्या व्यक्तीनं मनावर घेतल्यास तो शेतीमध्ये असे काही प्रयोग करतो की संपूर्ण जगच थक्क होऊन पाहत राहतं. असाच काहीसा प्रयोग ब्रिटिश नागरिक (British Citizen) असलेल्या डगलस स्मिथ यानं केला आहे. 43 वर्षीय डगलस यांचं असं म्हणणं आहे, की त्यांनी टोमॅटोच्या एकाचा फांदीवरुन 839 टोमॅटोचं उत्पन्न मिळवलं (839 Tomatoes Harvested from Single Branch) आहे. डगलस स्मिथ (Douglas Smith) यांनी मार्च महिन्यात टोमॅटोचे बीज लावले होते. या टोमॅटोसाठी प्रत्येक रोपाला ते आठवड्यात 3-4 तास देत असत. ग्रीनहाऊसमध्ये त्यांनी टोमॅटोची रोपे लावली. मागील वर्षीच त्यांनी ब्रिटनमधील सर्वात मोठं टोमॅटोचं रोपटं उगवत रेकॉर्ड (World Record) कायम केला होता. यावेळी त्यांनी आपल्या या छंदाला आणखी काही वेळ दिला आणि एकाच फांदीवर सर्वाधिक टोमॅटो आणण्याचं रेकॉर्डही कायम ठेवलं. 61 वर्षाच्या BF ला घरी घेऊन गेली 19 वर्षीय तरुणी; कुटुंबीयांनी उचललं मोठं पाऊल डगलस स्मिश हे खरं तर एक आयटी मॅनेजर आहेत. स्टँस्टीज अबॉट्समध्ये काम करणाऱ्या डगलस यांनी स्वतःच हे चॅलेंज घेतलं होतं. यासाठी त्यांनी मातीचंही सँपल घेत त्यावर काम केलं. त्यांनी बिया पेरून आधी टोमॅटोचं रोप तयार केलं. या कामावर त्यांनी आपला भरपूर वेळ घालवला. अखेर त्यांना याचं फळ मिळालंच. या झाडावरील टोमॅटो तोडताना त्यांनी पोलिसांनाही बोलावलं होतं. जेणेकरून हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी व्हेरिफाय होईल. त्यांनी आपल्या फार्ममध्ये लावलेल्या टोमॅटोच्या एका फांदीवरुनच तब्बल 839 तोडले, हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही हैराण झाले. 70 वर्षीय आजीची नातवासोबत मस्ती; चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी फिदा, VIDEO याआधी टोमॅटोच्या झाडाच्या एका फांदीवरून सर्वाधिक टोमॅटो तोडण्याचं हे रेकॉर्ड ग्राहम टँटर यांच्या नावी होतं. त्यांनी एकाच फांदीवर 448 टोमॅटोचं उत्पन्न घेत 2010 मध्ये रेकॉर्ड बनवला होता. आता डगलसनं त्यांच्यापेक्षा दुप्पट टोमॅटोचं उत्पन्न घेत हा रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे. त्यांनी टोमॅटोचं पीक घेताना आणि ते तोडताना याची संपूर्ण काळजी घेतली की त्यांच्याकडून सर्व नियमांचं पालन व्हावं. इंग्लंडमध्ये त्यांच्या शेतीकडे आता वेगळ्याच नजरेनं पाहिलं जात आहे. लोक आता त्यांच्या कामाचं कौतुक करत आहेत. या पद्धतीची वाटचाल शेतीला एका नव्या उंचीवर पोहोचवू शकते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Farmer, Tomato, Viral news

    पुढील बातम्या