Home /News /viral /

शरीरावर आधी 60 टॅटू, आता थेट डोळ्यांमध्ये भरला रंग; भयंकर PHOTO पाहून तुम्हीही हैराण व्हाल

शरीरावर आधी 60 टॅटू, आता थेट डोळ्यांमध्ये भरला रंग; भयंकर PHOTO पाहून तुम्हीही हैराण व्हाल

18 वर्षांचा असताना त्याने शरीरावर पहिला टॅटू काढला होता. आणि आता 44 व्या वर्षापर्यंत त्याच्या शरीरावर तब्बल 60 टॅटू आहेत. पण त्याने आता काढलेला टॅटू अतिशय भयंकर हैराण करणारा आहे.

  नवी दिल्ली, 10 एप्रिल : सध्या टॅटू काढण्याचा ट्रेड चांगलाच चर्चेत आहे. अनेक जण विविध रंगाचे, डिझाइनचे टॅटू काढताना दिसताना. कोणी हातावर, दंडावर, पायावर, मानेवर असे कुठेही टॅटू काढतात. काही तर अतिशय विचित्र ठिकाणीही टॅटू काढतात. पण एका व्यक्तीने चक्क आपल्या डोळ्यातच टॅटू काढला आहे. त्याने हा टॅटू काढल्यानंतर त्याचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या 44 वर्षीय अँड्रियास स्टॉफिगर (Andreas Stauffiger) या व्यक्तीला टॅटू काढण्याची अतिशय आवड आहे. तो एक फायर फायटर आहे. तो 18 वर्षांचा असताना त्याने शरीरावर पहिला टॅटू काढला होता. आणि आता 44 व्या वर्षापर्यंत त्याच्या शरीरावर तब्बल 60 टॅटू आहेत. पण त्याने आता काढलेला टॅटू अतिशय भयंकर हैराण करणारा आहे. त्याचा हा टॅटू पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून, धक्का बसल्याचं म्हटलं आहे.

  हे वाचा - 50 दुकानं लुटून झळकावले 'बबली'ने अर्धशतक, 51 व्या दुकानात झाली 'आऊट', पाहा हा VIDEO

  अँड्रियास नावाच्या या व्यक्तीने आपल्या डोळ्यांच्या सफेद भागावर टॅटू केला आहे. डेली स्टार रिपोर्टनुसार, त्याने स्क्लीरल टॅटूइंग (Scleral Tattooing) केलं आहे. या टॅटू स्टाइलमध्ये डोळ्यांच्या सफेद भागात इंजेक्शनद्वारे रंग भरला जातो. ही अतिशय धोकादायक तसंच भयंकर पद्धत आहे. पण अँड्रियासला या टॅटूवेळी जराही दुखलं नसल्याचं त्याने म्हटलं आहे. त्याने नियॉन ग्रीन आणि पर्पल रंग डोळ्यांच्या सफेद भागात भरला आहे. अँड्रियासने डोळ्यांमध्ये अशाप्रकारे टॅटू केल्यानंतर, रंग भरल्यानंतर काही दिवसांत त्याचं डोकं दुखू लागलं. पण ते 3 दिवसांत ठिक झाल्याचंही तो म्हणाला.
  या टॅटूनंतरचा अनुभवही त्याने शेअर केला आहे. टॅटूच्या या प्रोसिजरनंतर डोळे सूजतात आणि डोळ्यात रेतीसारखं काही गेल्याचं वाटतं. पूर्णपणे डोळे पूर्ववत नीट होण्यासाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागतो, असं त्याने सांगितलं. तसंच हा टॅटू काढल्यानंतर डोळ्यांचा सफेद रंग पुन्हा आणता येत नाही. पण काही काळानंतर हा रंग फिकट होत जातो असंही त्याने म्हटलंय. आता डोळ्यांनंतर त्याचं पुढचं लक्ष्य जीभ आहे. जीभेला दोन भागात विभागून त्यावर पर्पल आणि ग्रीन रंग देण्याचा त्याचा प्लॅन आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Viral photo

  पुढील बातम्या