अरे! ही बाईक आहे की कार? VIRAL VIDEO पाहून नेटकरीही गोंधळले

अरे! ही बाईक आहे की कार? VIRAL VIDEO पाहून नेटकरीही गोंधळले

एका व्यक्तीनं जुगाड करत आपल्या बाईकचं (Bike) संपूर्ण रूपच बदलून टाकलं असून त्याला कारचा लुक दिला आहे. या बाईकचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Video Viral) होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 18 जून : देशासह संपूर्ण जगभरातच काहीतरी जुगाड करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पद्धतीचा वापर करत लोक एकाहून एक मजेशीर वस्तू तयार करतात. याचे व्हिडिओही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाल्याचे पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ तर इतके मजेशीर (Funny Video) असतात की त्यांचं भरभरुन कौतुक होतं. तर, काही व्हिडिओची सर्वांनाच थक्क करतात. अशाच एका जुगाडाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओनं नेटकरीही हैराण झाले आहेत.

महिलेनं तरुणीला मारहाण करत हिसकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद

जुगाड टेक्नॉलोजी पाहून मोठमोठ्या व्यक्तीही हैराण होतात. मात्र, लोक याचं कौतुकही करतात. एका व्यक्तीनं जुगाड करत आपल्या बाईकचं (Bike) संपूर्ण रूपच बदलून टाकलं असून त्याला कारचा लुक दिला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कशाप्रकारे या व्यक्तीनं आपल्या बाईकला हँडलच्या जागी चारचाकीची स्टियरिंग बसवली आहे. तर, क्लचच्या जागी कारमधील गियर बसवला आहे.

VIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच मजा आली असेल आणि ही गाडी बनवणाऱ्या व्यक्तीचंही कुतूहल वाटलं असेल. ट्विटरवर हा व्हिडिओ ‘Pulse Live Kenya’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक यावर निरनिराळ्या कमेंट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Published by: Kiran Pharate
First published: June 18, 2021, 8:30 AM IST

ताज्या बातम्या