मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्तन आणि पायाच्या आकारापासून बेडवरील ड्रेसपर्यंत; Matrimonial ad मध्ये तरुणाच्या विचित्र अटी

स्तन आणि पायाच्या आकारापासून बेडवरील ड्रेसपर्यंत; Matrimonial ad मध्ये तरुणाच्या विचित्र अटी

या व्यक्तीने ‘कंझर्व्हेटिव्ह’, ‘लिबरल,’ ‘प्रो-लाइफ’ यांसारख्या मूल्यांपासून अगदी ब्रा आणि पायाच्या साईजपर्यंतच्या (Bra and Feet Size) आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : तरुण आणि तरुणी लग्नासाठी पार्टनर शोधण्याकरता अनेकदा जाहिरात (Matrimonial ad) देतात. हे आजकाल काही नवीन नाही. मात्र, यातील काही जाहिराती पाहून असा प्रश्न पडतो की या खरंच एखाद्या समजदार व्यक्तीने दिल्या आहेत की एखाद्या लहान मुलाने मस्करी केली आहे. सध्या रेडिट या सोशल मीडिया साईटवर अशीच एक विचित्र जाहिरात व्हायरल (Weird Matrimonial ad Viral) झाली आहे. Betterhalf.ai या साईटवरील ही जाहिरात आहे. यात या व्यक्तीने जाहिरातीच्या पहिल्या तीन ओळींमध्ये मुलीबद्दलच्या अपेक्षा लिहिल्या आहेत. यात त्याने ‘कंझर्व्हेटिव्ह’, ‘लिबरल,’ ‘प्रो-लाइफ’ यांसारख्या मूल्यांपासून अगदी ब्रा आणि पायाच्या साईजपर्यंतच्या (Bra and Feet Size) आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

या व्यक्तीची अशी इच्छा आहे की त्याच्या पार्टनरनं मॅनिक्यूअर-पेडीक्यूअर केलंलं असावं आणि ती अतिशय स्वच्छ असावी. जोडीदाराकडून स्वच्छतेची अपेक्षा करणं नक्कीच चुकीचं नाही. मात्र या व्यक्तीनं ज्या पद्धतीने आपल्या अपेक्षा सांगितल्या आहेत ते विचित्र आहे. त्यानं पुढे लिहिलं की तिचा पोशाख 80% कॅज्युअल आणि 20% फॉर्मल असावा. बेडवरही तिनं चांगले कपडे परिधान करावे.

कमरेचा आकार, बेडवरील कपडे यानंतर तो पुन्हा इतर गोष्टींकडे वळाला. त्यानं म्हटलं की मुलगी विश्वासू, ईमानदार असावी तसंत चित्रपट, रोड ट्रिप्स आणि कौंटुबीक समारंभांमध्येही तिनं सहभागी व्हावं. सोबतच मुलगी 18-26 या वयोगटातील असावी, असा उल्लेखही त्याने केला. यासोबतच त्याने स्वतःची काही खासगी माहितीही शेअर केलेली दिसते.

लग्नासाठीची ही अजब जाहिरात पाहून नेटकरीही चक्रावले आहेत. एका यूजरनं लिहिलं, अशी मुलगी त्याला 2077 पर्य़ंत भेटेल. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, हा व्यक्ती लेडीज टेलर आहे आहे. सहाजिकच ही अजब जाहिरात ट्विटरवरही व्हायरल झाली. मात्र Twitterati ने याबाबत कंपनीला नोटीस पाठवताच आवश्यक कारवाई केली गेली.

First published:

Tags: Marriage, Shocking