नवी दिल्ली 22 नोव्हेंबर : एका व्यक्तीने असा रेकॉर्ड (Guinness World Record ) आपल्या नावी केला आहे ज्याबद्दल ऐकूनच तुम्हाला अजब वाटेल. सहसा आपला एखादा केसही ओढला गेला तरी प्रचंड वेदना होतात. अशात कोणी आपल्या दाढीच्या सहाय्याने 63 किलो वजन उचललं तर ? त्या व्यक्तीची काय अवस्था होईल याचा विचारही करवत नाही. मात्र या वेदनाही आनंदात बदलल्या जेव्हा अँटानस कोंट्रिमासने आपल्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला (Man Lifted 63 Kg Woman by his Beard).
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये अँटानस असं काही करताना दिसतात, ज्याबद्दल आपण कधी विचारही केला नसेल. त्यांच्या दाढीचे केस इतके मजबूत आहे की 63 किलो वजन उचलूनही ते तुटले नाहीत. मात्र यावेळी त्यांच्या डोळ्यांमध्ये वेदना स्पष्ट दिसत होत्या.
अँटानस नावाच्या या व्यक्तीच्या कारनाम्याचा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं, अँटानस कोंट्रिमास (Antanas Kontrimas) या व्यक्तीने आपल्या दाढीने 63.80 किलोग्रॅमचं सर्वात जड वजन उचललं. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती इतकं वजन उचलताना लाईव्ह पाहायला मिळतो. त्याच्या डोळ्यांमध्ये वेदना आहेत. मात्र सोबतच समाधानही आहे. त्यांनी 63 किलो वजन असलेल्या महिलेल्या आपल्या दाढीच्या सहाय्याने उचलून संपूर्ण जगालाच अचंबित केलं.
View this post on Instagram
हा व्हिडिओ पाहून सगळेच शॉक झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका यूजरनं यावर कमेंट करत म्हटलं, हा व्यक्ती कोणत्या हेअर प्रोडक्ट्सचा वापर करत असेल माहिती नाही. याशिवाय इतरही अनेकांनी कमेंट करत या व्यक्तीचं कौतुक केलं तसं त्याच्या वेदना समजू शकतो, असंही म्हटलं. याआधी एका महिलेनं आपल्या बायसेप्सने दहा सफरचंद फोडत जागतिक रेकॉर्ड बनवला होता. या व्हिडिओनंही लोकांचं लक्ष वेधलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.