Home /News /viral /

प्रेमविवाहानंतर 14 दिवसातच झाले विभक्त; पतीने सांगितलेलं अजब कारण ऐकून हादरली पत्नी

प्रेमविवाहानंतर 14 दिवसातच झाले विभक्त; पतीने सांगितलेलं अजब कारण ऐकून हादरली पत्नी

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

सेल्सी जोन्स आणि तिच्या पतीची प्रेमकथा अगदी परीकथांसारखी होती. तिचा पार्टनर तिला नेहमी आनंदी ठेवत असे आणि तिच्यावर खूप प्रेम करत असे.

  नवी दिल्ली 19 जानेवारी : प्रेयसी आणि प्रियकरापासून (Lovers) पती-पत्नी (Husband and Wife) बनवण्यापर्यंतच एखाद्या जोडप्याचं नातं अतिशय खास असतं. अशात जर लग्नानंतर काही दिवसातच तुमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तुमच्या पार्टनरने तुम्हाला सांगितलं की आता तो तुमच्यावर प्रेम करत नाही, तर तुमची काय अवस्था होईल? सेल्सी जोनस नावाच्या तरुणीसोबतही असंच घडलं. तिच्या पार्टनरने तिला एक सुंदर स्वप्न दाखवून एकटं सोडलं. लग्नाआधीच नवरदेवाने केलेली विचित्र मागणी ऐकून शरमली नवरीबाई, Wedding Video TikTok वर सेल्सी जोनस हिने आपली स्टोरी शेअर केली आहे. तिने सांगितलं, की तिच्या पतीने अशाप्रकारे अतिशय अनोख्या अंदाजात तिला लग्नासाठी प्रपोज केलं. यानंतर दोघांनी अतिशय उत्साहात लग्नगाठ बांधली आणि एकमेकांच्या प्रेमात दोघंही अकंठ बुडाले. मात्र, लग्नानंतर अवघ्या 14 दिवसातच सेल्सीच्या पतीचा विचार बदलला. त्याने सांगितलेलं सत्य जाणून सेल्सीला धक्काच बसला. सेल्सी जोन्स आणि तिच्या पतीची प्रेमकथा अगदी परीकथांसारखी होती. तिचा पार्टनर तिला नेहमी आनंदी ठेवत असे आणि तिच्यावर खूप प्रेम करत असे. त्याने बॉयफ्रेंडनं सेल्सीला केलेलं प्रपोजही इतकं खास होतं, जे कोणाचंही मन जिंकेल. पॅरिसच्या डिज्नीलँडमध्ये तिच्या बॉयफ्रेंडनं तिला प्रपोज केलं आणि इथूनच त्यांचं नातं सुरू झालं. सुरुवातीला कोरोनामुळे त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली. मात्र अखेर दोघांनी लग्नगाठ बांधलीच. सेल्सीचा पती रोज तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असे आणि आपलं संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याची स्वप्न बघत असे. मात्र, अचानक या प्रेमकथेत मोठा ट्विस्ट आला.

  महिलेनं पतीलाच ऑनलाईन विकलं; जाहिरातीत लिहिलेला मजकूर वाचून व्हाल शॉक

  ब्रिटिश व्लॉगर सेल्सीने सांगितलं की लग्नानंतर दोन आठवड्यातच तिच्या पतीचे सगळे शब्द जणू बदललेच. त्याने स्पष्टपणे सांगितलं, की आता तो सेल्सीवर प्रेम करत नाही. हे ऐकून तिच्या पायाखालची जमिनीच सरकली. हा धक्का इतका मोठा होता, की आता तिचा लग्नावरच विश्वास राहिलेला नाही. सेल्सीची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिला वेगवेगळे सल्ले दिले आहेत. एका यूजरने तिला स्वतःला वेळ देण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या एकाने सल्ला देत म्हटलं की कोणावरही विश्वास ठेवणं बंद कर.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Love story

  पुढील बातम्या