मराठी बातम्या /बातम्या /Viral /1 वर्षापासून ज्या तरुणीसोबत होतं अफेअर, ती मित्राचीच बायको निघाली; समजताच तरुणाने घेतला अजब निर्णय

1 वर्षापासून ज्या तरुणीसोबत होतं अफेअर, ती मित्राचीच बायको निघाली; समजताच तरुणाने घेतला अजब निर्णय

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

झाऊचं त्या तरुणीसोबत बोलणं सुरू झालं, त्यांच्यात सामंजस्य निर्माण झालं आणि दोघेही ऑनलाइन रिलेशनशिपमध्ये आले. हे लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप बराच काळ चालू राहिलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 01 एप्रिल : “दोस्त, दोस्त ना रहा, प्यार-प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा, एतबार ना रहा…”, तुम्ही हे प्रसिद्ध गाणं अनेकदा ऐकलं असेलय. पण त्यातील भावना आणि अर्थ तुम्हाला माहीत नसेल. मात्र आता चीनमधून असं एक प्रकरण समोर आलं आहे, जिथे हे गाणं अगदी बरोबर फिट होत आहे. यात एका व्यक्तीने बेस्ट फ्रेंडच्या पत्नीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, चीनच्या हेनान प्रांतातील रहिवासी असलेला झाऊ म्यानमारमध्ये राहतो आणि तिथे टरबूजांचा व्यापार करतो. खूप दिवसांपासून तो लग्नाचा विचार करत होता पण त्याला मुलगी मिळत नव्हती. वर्षानुवर्षे म्यानमारमध्ये राहूनही तो चीनमधील त्याचा चांगला मित्र जियाओ ली याच्याशी जोडलेला होता. गेल्या वर्षी त्याने जियाओ सांगितलं की व्यवसाय चांगला चालला आहे आणि आता तो लग्नासाठी तयार आहे.

तेव्हा जियाओनं त्याला सांगितलं की त्याच्या पत्नीची एक महिला मैत्रीण आहे, जी अविवाहित आहे आणि ती त्याच्यासाठी योग्य असेल. जियाओने पत्नीच्या माध्यमातून त्या महिला मैत्रिणीशी बोलणं करून देण्याचं आश्वासनही दिलं होतं. त्यानुसार झाऊचं त्या तरुणीसोबत बोलणं सुरू झालं, त्यांच्यात सामंजस्य निर्माण झालं आणि दोघेही ऑनलाइन रिलेशनशिपमध्ये आले. हे लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप बराच काळ चालू राहिलं आणि चीनला गेल्यावर झाऊने त्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं. पण अचानक मुलीचा खरा रंग दिसायला लागला.

एके दिवशी तिने फोनवर झाऊला सांगितलं की त्याच्या भावाचा एका कंस्ट्रक्शन साइटवर अपघात झाला आहे आणि त्याच्या उपचारासाठी तिला 60 हजार रुपयांची गरज आहे. झाऊने तिला ते पैसे दिले. मात्र त्यानंतर मुलीने वडिलांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगून काही पैसे मागितले. अशाप्रकारे तिने त्याच्याकडून 1 वर्षात 9 लाखांहून अधिक रुपये उकळले. तो तिच्यावर प्रेम करू लागला, त्यामुळेच तो पैसे देत राहिला. काही काळानंतर त्याने त्याच्या मित्राला जियाओला सांगितलं की त्याचं नातं चांगलं चाललं आहे आणि त्याला चीनमध्ये येऊन मुलीशी लग्न करायचं आहे, तेव्हा त्याच्या मित्राने सांगितलं की ती मुलगी वास्तवात नाहीच, ती त्याची पत्नीच आहे, जी दुसरी मुलगी असल्याचं नाटक करून तुझ्यासोबत बोलत होती.

जियाओनं सांगितलं की त्यालाही नुकतंच याबद्दल समजलं आणि त्याची पत्नी त्याला सोडून पळून गेली आहे. हे ऐकून झाऊसंतप्त झाला आणि त्याने पोलिसात तक्रार करणार असल्याचं सांगितलं. परंतु जियाओने पत्नीच्या इमेजसाठी त्याला असे करण्यापासून रोखले आणि आपण संपूर्ण पैसे परत करणार असल्याचे सांगितले. मात्र काही काळानंतरही तो पैसे परत करू न शकल्याने झाऊने पोलिसांत तक्रार केली आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू असून पत्नीचा शोध सुरू आहे. तसंच या घटनेत जियाओही आपल्या पत्नीसोबत सहभागी होता का? हेदेखील शोधलं जात आहे.

प्रेयसीसोबत राहण्यासाठी पतीचं कांड, रचला स्वतःच्याच मृत्यूचा बनाव, पण पत्नीसमोर पोलखोल झाली अन्...

“दोस्त, दोस्त ना रहा, प्यार-प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा, एतबार ना रहा…”, तुम्ही हे प्रसिद्ध गाणं अनेकदा ऐकलं असेलय. पण त्यातील भावना आणि अर्थ तुम्हाला माहीत नसेल. मात्र आता चीनमधून असं एक प्रकरण समोर आलं आहे, जिथे हे गाणं अगदी बरोबर फिट होत आहे. यात एका व्यक्तीने बेस्ट फ्रेंडच्या पत्नीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, चीनच्या हेनान प्रांतातील रहिवासी असलेला झाऊ म्यानमारमध्ये राहतो आणि तिथे टरबूजांचा व्यापार करतो. खूप दिवसांपासून तो लग्नाचा विचार करत होता पण त्याला मुलगी मिळत नव्हती. वर्षानुवर्षे म्यानमारमध्ये राहूनही तो चीनमधील त्याचा चांगला मित्र जियाओ ली याच्याशी जोडलेला होता. गेल्या वर्षी त्याने जियाओ सांगितलं की व्यवसाय चांगला चालला आहे आणि आता तो लग्नासाठी तयार आहे.

तेव्हा जियाओनं त्याला सांगितलं की त्याच्या पत्नीची एक महिला मैत्रीण आहे, जी अविवाहित आहे आणि ती त्याच्यासाठी योग्य असेल. जियाओने पत्नीच्या माध्यमातून त्या महिला मैत्रिणीशी बोलणं करून देण्याचं आश्वासनही दिलं होतं. त्यानुसार झाऊचं त्या तरुणीसोबत बोलणं सुरू झालं, त्यांच्यात सामंजस्य निर्माण झालं आणि दोघेही ऑनलाइन रिलेशनशिपमध्ये आले. हे लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप बराच काळ चालू राहिलं आणि चीनला गेल्यावर झाऊने त्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं. पण अचानक मुलीचा खरा रंग दिसायला लागला.

एके दिवशी तिने फोनवर झाऊला सांगितलं की त्याच्या भावाचा एका कंस्ट्रक्शन साइटवर अपघात झाला आहे आणि त्याच्या उपचारासाठी तिला 60 हजार रुपयांची गरज आहे. झाऊने तिला ते पैसे दिले. मात्र त्यानंतर मुलीने वडिलांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगून काही पैसे मागितले. अशाप्रकारे तिने त्याच्याकडून 1 वर्षात 9 लाखांहून अधिक रुपये उकळले. तो तिच्यावर प्रेम करू लागला, त्यामुळेच तो पैसे देत राहिला. काही काळानंतर त्याने त्याच्या मित्राला जियाओला सांगितलं की त्याचं नातं चांगलं चाललं आहे आणि त्याला चीनमध्ये येऊन मुलीशी लग्न करायचं आहे, तेव्हा त्याच्या मित्राने सांगितलं की ती मुलगी वास्तवात नाहीच, ती त्याची पत्नीच आहे, जी दुसरी मुलगी असल्याचं नाटक करून तुझ्यासोबत बोलत होती.

जियाओनं सांगितलं की त्यालाही नुकतंच याबद्दल समजलं आणि त्याची पत्नी त्याला सोडून पळून गेली आहे. हे ऐकून झाऊसंतप्त झाला आणि त्याने पोलिसात तक्रार करणार असल्याचं सांगितलं. परंतु जियाओने पत्नीच्या इमेजसाठी त्याला असे करण्यापासून रोखले आणि आपण संपूर्ण पैसे परत करणार असल्याचे सांगितले. मात्र काही काळानंतरही तो पैसे परत करू न शकल्याने झाऊने पोलिसांत तक्रार केली आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू असून पत्नीचा शोध सुरू आहे. तसंच या घटनेत जियाओही आपल्या पत्नीसोबत सहभागी होता का? हेदेखील शोधलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Love story, Viral news