मुंबई, 25 मे : मगर... नाव ऐकूनच अंगाला दरदरून घाम फुटतो. काही लोकांना तर मगरीला स्वतःच्या हाताने खायला घालण्याचीही आवड असते. तर कुणाला मगरीसोबत स्टंट करायला आवडतं. एक तरुण तर याच्याही पुढे गेला आहे
(Scary Video of Crocodile and Man). त्याने तर चक्क मगरीसोबत रोमान्सच केला आहे. मगरीसोबत रोमान्स करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
(Man romance with crocodile).
ज्या मगरीच्या जवळ जाण्याची हिंमतही कुणाचीच नसते, अशा मगरीला हा तरुण मिठी मारताना, किस करताना दिसला आहे
(Man Hugs and kissed Crocodile). जसं एखादं कपल एकमेकांसोबत रोमान्स करतं अगदी तसंच हा तरुण मगरीसोबत करताना दिसला. तुम्हाला फक्त ऐकून विश्वास बसणार नाही. मग हा व्हिडीओच पाहा.
व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक मगरीचा हात दिसतो. त्यानंतर मगरीच्या हातात एक माणसाचा हात दिसतो. एक तरुण मगरीच्या हातात आपला हात टाकतो. जसे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड किंवा नवरा-बायको प्रेमाने एकमेकांचा हातात हात टाकतात अगदी तसंच हा तरुण मगरीच्या हातात हात टाकतो. त्यानंतर तो मगरीच्या तोंडाजवळ आपलं तोंड नेतो आणि मगरीला किसही करताना दिसतो.
हे वाचा - आधी पाल असलेली Cold drink दिली आणि नंतर...; McDonald’s मधील संतापजनक प्रकार; Video Viral
त्यानंतर तो मगरीच्या शेजारी झोपून मगरीसोबत खेळताना दिसतो. मगरीला आपल्या मिठीत घेऊन कुरवाळतो. त्यानंतर मगरीच्या पाठीवरही बसतो.
हा व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. पण तरुणाच्या चेहऱ्यावर मात्र किंचितशीही भीती दिसत नाही. तो बिनधास्तपणे मगरीसोबत खेळताना, रोमान्स करताना दिसतो आहे. शॉकिंग म्हणजे मगरीही त्याला काहीच करत नाही. त्यासुद्धा अगदी शांत दिसत आहेत. तरुणासोबत त्याही मजा लुटत आहेत.
हे वाचा - बॅट, तवा, काठीने दररोज बेदम मारहाण करायची बायको; वैतागलेल्या प्रिन्सिपल नवऱ्याने अखेर...; CCTV मध्ये भयानक दृश्य कैद
world_of_snakes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. काही युझर्सनी या तरुणाच्या हिमतीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मगर भुकेली नसल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.