Home /News /viral /

लाथ मारताच अचानक कोसळली भिंत आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

लाथ मारताच अचानक कोसळली भिंत आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

तरुणाने लाथेने भिंत पाडण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला पण त्याच्या दुसऱ्याच क्षणी असं काही घडलं की धडकीच भरेल.

  मुंबई, 02 एप्रिल : काही तरी डेअरिंगबाज करण्याच्या नादात आपण अनेकदा स्वतःलाच संकटात टाकतो. असंच घडलं या व्यक्तीसोबत. ज्याने लाथ मारून भिंत (Man trying to pull down wall) पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न यशस्वीही झाला. पण त्याने भिंत पाडली त्याच्या दुसऱ्याच क्षणी असं काहीतरी घडलं की पाहून सुरुवातीला काळजाचा ठोकाच चुकेल (Shocking video). पण नंतर मात्र हसू आवरणार नाही. भिंतीसोबत स्टंट करण्याच्या नादात या व्यक्तीने असं काही केलं ज्याचा भलताच परिणाम झाला. आपल्यासोबत असंकाही होईल याची कल्पनाही या व्यक्तीने केली नसावी. व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती एका बंद खोलीत आली. ती एखाद्या कन्स्ट्रक्शन ठिकाणी आहे, असं एकंदर दिसून येतं. ही व्यक्ती भिंतीला लाथ मारताना दिसते. हे वाचा - VIDEO - भररस्त्यात BF ला मारत होती GF, पाहताच भडकला डिलीव्हरी बॉय; तरुणीसोबत धक्कादायक कृत्य बऱ्याच वेळा ती लाथ मारत राहते. एक लाथ मारून ती बाजूला होते. त्यानंतर भिंत काही पडत नाही. त्यानंतर पुन्हा मागे येऊन लाथ मारते आणि तिथून जाते तेव्हा त्या व्यक्तीचा पाय घसरून ती जमिनीवर आडवी पडते. तितक्यात काही वेळातच भिंतही कोसळते.
  भिंत त्या व्यक्तीवर पडणार तोच या व्यक्तीचा व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती तिला सावध करते. भिंत कोसळत असल्याचं सांगते आणि घाबरून ही व्यक्ती पटकन उठते आणि त्याचक्षणी भिंत जमिनीवर पडते. व्हिडीओ पाहताच काळजाचा ठोका चुकतो. हे वाचा - VIDEO - पिल्लांना वाचवण्यासाठी जंगलाच्या राजालाही सामोरी गेली आई; शेवटपर्यंत सिंहाशी भिडली अखेर... सुदैवाने व्यक्ती वेळेत जमिनीवर उठून बसल्याने भिंत तिच्या अंगावर पडत नाही, ती बचावते. pinkberrydresses नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Shocking video viral, Viral, Viral videos

  पुढील बातम्या