मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - बाटलीऐवजी मित्राच्या भलत्याच भागावर बसली जोरदार किक; खेळाखेळात झाली भयंकर चूक

VIDEO - बाटलीऐवजी मित्राच्या भलत्याच भागावर बसली जोरदार किक; खेळाखेळात झाली भयंकर चूक

 मित्राच्या डोक्यावरील बाटलीला किक मारताना त्याच्या भलत्याच भागावर लाथ लागली.

मित्राच्या डोक्यावरील बाटलीला किक मारताना त्याच्या भलत्याच भागावर लाथ लागली.

मित्राच्या डोक्यावरील बाटलीला किक मारताना त्याच्या भलत्याच भागावर लाथ लागली.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 31 मे : तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बरेच खेळ खेळला असाल. काही छोटेमोठे स्टंटही केले असतील. पण बऱ्याचदा असे छोटे खेळ आणि स्टंटही भयकंर ठरू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका मित्राने दुसऱ्या मित्रासोबत खेळ खेळताना भयंकर चूक केली आणि त्यामुळे मोठी दुर्घटना झाली.  मित्राच्या डोक्यावरील बाटलीला किक मारताना त्याच्या भलत्याच भागावर लाथ लागली (Stunt video viral). दोन मित्र आपसात मस्ती करत होते. एकाने आपल्या डोक्यावर एक बाटली ठेवली आणि दुसरा त्या डोक्यावरील बाटलीला किक मारायला गेला. पण नेम चूकला आणि नको तेच घडलं (Man kicked friend’s face while hitting bottle video). व्हिडीओत पाहू शकता, एका व्यक्ती गुडघ्यावर बसली आहे, तिच्या डोक्यावर एक बिअरचा कॅन ठेवण्यात आला आहे. तिच्यासमोर एक व्यक्ती उभी आहे. जी या डोक्यावरील बाटलीला लाथ मारायला धावत येते. ही व्यक्ती जशी लाथ उचलून त्या बाटलीवर मारायला जाते तेव्हा तिचा नेम चुकतो. बाटलीऐवजी लाथ दुसऱ्या तरुणाच्या भलत्याच भागावर लागते. नको तिथं ही लाथ जोरदर बसते. व्हिडीओ पाहूनच आपल्याला धडकी भरते. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये आहे. ज्यामध्ये लाथ या व्यक्तीच्या मानेवर बसल्याचं दिसतं. ती इतकी जोरात बसली की दोघंही जण धाडकन जमिनीवर कोसळलतात. ज्या व्यक्तीला लाथ बसली तिचा चेहरा पूर्णपणे हलल्याचा दिसतो. हे वाचा - OMG! हे कसं शक्य आहे? महिलेचा चमत्कारिक Pregnancy Video पाहून चक्रावले नेटिझन्स @vivenmenosviral ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींना हा व्हिडीओ मजेशीर वाटला आहे तर काही जण व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत.
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या