Home /News /viral /

तरुणाने उंच इमारतीवरुन उडी घेत ब्लॅकफ्लिप मारली पण...; खतरनाक स्टंट VIDEO

तरुणाने उंच इमारतीवरुन उडी घेत ब्लॅकफ्लिप मारली पण...; खतरनाक स्टंट VIDEO

व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती कोणत्याही भीतीशिवाय अतिशय धाडसाने उंच बिल्डिंगच्या अगदी काठावर उभा आहे. तो तिथून मागे उडी घेण्याच्या प्रयत्नात आहे

  नवी दिल्ली 23 एप्रिल : काही लोक स्टंट करण्यात अतिशय पटाईत असतात. त्यांचे धोकादायक स्टंट पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. अनेकदा काहींचे स्टंट यशस्वी ठरतात आणि ते प्रसिद्ध होतात तर अनेकदा स्टंट करत असताना काहींसोबत भयंकर दुर्घटनाही घडतात. म्हणूनच स्टंट करण्याआधी भरपूर सराव करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून कोणतीही चूक किंवा अपघात होणार नाही. सोशल मीडियावर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ (Stunt Video Viral) पाहायला मिळतील, ज्यामध्ये लोक वेगवेगळे आणि धोकादायक स्टंट करताना दिसतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुद्दाम क्रॅश केलं स्वतःचं विमान; मात्र उडी घेताना घडलं असं काही की.., धक्कादायक VIDEO सध्या स्टंटचा असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती कोणत्याही भीतीशिवाय अतिशय धाडसाने उंच बिल्डिंगच्या अगदी काठावर उभा आहे. तो तिथून मागे उडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. तो हवेतच बॅकफ्लिप मारत मागे उडी घेतो. त्याला जराही भीती वाटत नाही. मात्र या व्यक्तीच्या पायात एक जाड मोठी दोरी बांधलेली असते. मात्र तरीही धोका कायम असतो.
  कारण या व्यक्तीच्या वजनाने कधी ही दोरी तुटेल आणि तो खाली कोसळेल, हे कोणीही सांगू शकत नाही. या व्यक्तीने जिथून उडी घेतली, तिथून खालचं दृश्य पाहून तुमचाही थरकाप उडेल. मात्र त्याचं धाडस कौतुकास्पद होतं. सहसा उंच इमारतीवर चढलं की खालचं दृश्य पाहूनच लोक चक्रावून जातात. मात्र हा व्यक्ती इतक्या उंचावरुन उडी घेत असूनही त्याच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नाही. रस्त्यावर वेगात चालवत होता सायकल; इतक्यात अचानक निघून पडलं चाक; घटनेचा Shocking Video अंगावर काटा आणणाा हा व्हिडिओ beautiffulgram_to नावाच्या अकाऊंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 9 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं आहे की, 'वेडे लोक अशा वेड्या गोष्टी करतात', तर इतर अनेक वापरकर्त्यांनी भीतीपोटी म्हटलं आहे की, या व्हिडिओच्या शेवटच्या भागात काय झालं ते दाखवू नका.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Stunt video

  पुढील बातम्या