व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मोठा खड्डा आहे आणि एक कार त्याच खड्ड्याकडे वेगाने येत आहे. गाडी चालवणारी व्यक्ती कार खड्ड्यात जाण्यापूर्वी त्यातून उडी मारते आणि त्यानंतर गाडी सरळ जाऊन खड्ड्यातच पडते. यात आश्चर्याची बाब म्हणजे गाडी खड्ड्यात पडल्यानंतर सरळ उभी राहते. चालत्या वाहनातून उडी घेऊन खड्ड्यात हे वाहन सरळ उभा करणं, हीदेखील एक प्रकारची कला आहे. त्यासाठी संतुलन आवश्यक आहे. यासोबतच वाहनाचा वेगही कळला पाहिजे की, वाहन कोणत्या वेगाने चालवल्यास असे बॅलन्सिंग स्टंट तुम्ही करू शकाल. हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. VIDEO: फोनवर बोलत रस्त्यावरुन चाललेली महिला मॅनहोलमध्ये पडली; 18 सेकंदाचा थरार CCTV मध्ये कैद हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर radical4x4 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत 1.4 दशलक्ष म्हणजेच 14 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर 8 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईक देखील केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने ही पैशाची उधळपट्टी असल्याचं लिहिलं आहे, तर दुस-या यूजरने फास्ट अँड फ्युरियस स्टंट अयशस्वी झाल्याचं विनोदी पद्धतीनं लिहिलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.