Home /News /viral /

भरधाव कारमधून बाहेर येत थेट पुलावरुन घेतली उडी; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा Video Viral

भरधाव कारमधून बाहेर येत थेट पुलावरुन घेतली उडी; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा Video Viral

व्हिडिओमध्ये एक पूल दिसत आहे. एक कार भरधाव वेगाने या पुलाजवळ येते. गाडीच्या छतावर एक माणूस बसला आहे. तो माणूस काहीही विचार न करता चालत्या वाहनातून पुलावरुन उडी मारतो.

  नवी दिल्ली 17 एप्रिल : जगात adventure प्रेमींची कमतरता नाही. साहसाशी संबंधित व्हिडिओ दररोज इंटरनेटवर शेअर केले जातात. काही व्हिडिओ धक्कादायक तर काही अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सही हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चालत्या वाहनातून पुलावरुन उडी मारताना दिसतो (Man Jumped from Bridge). VIDEO: इवलासा चिमुकला स्केटबोर्ड घेऊन थेट पायऱ्यांवरच पोहोचला; पुढे जे केलं ते पाहून चुकेल काळजाचा ठोका पुलावरून उडी मारल्यानंतर जे घडतं ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. हा व्हिडिओ (Shocking Video Viral on Social Media) सोशल मीडिया यूजर्सच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये एक पूल दिसत आहे. एक कार भरधाव वेगाने या पुलाजवळ येते. गाडीच्या छतावर एक माणूस बसला आहे. तो माणूस काहीही विचार न करता चालत्या वाहनातून पुलावरुन उडी मारतो.
  पुलाखाली उडी घेताच तो फ्लिप मारतो आणि थोडं खाली गेल्यावर पॅराशूट उघडतो. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीला कारमधून उडी मारताना पाहून लोक हैराण झाले आहेत. व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. विशालकाय अजगराने हवेत उडी घेत केला बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न; लढाईचा शेवट झाला वेगळाच, पाहा VIDEO इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइकही केलं आहे. लोक कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याला या व्यक्तीचं धाडस मानत आहेत तर काही जण याला वेडेपणा म्हणत आहेत. अनेकांनी या व्यक्तीच्या धैर्याचं कौतुक केलं आणि ही पद्धत अनोखी असल्याचं म्हटलं.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Stunt video

  पुढील बातम्या