मुंबई, 12 एप्रिल : प्रसिद्ध होण्यासाठी हल्ली कुणी काहीही करायला तयार असतं. स्टंटचे तर बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. इतका खतरनाक स्टंट कदाचित तुम्ही कधीच पाहिला नसेल (Dangerous stunt video). व्हिडीओ पाहूनच धडकी भरेल. हृदय कमजोर असेल तर मन घट्ट करूनच हा व्हिडीओ पाहा.
काही तरुण उंचावरून उडी मारण्याचा स्टंट करतात. हा व्हिडीओही तसाच आहे. पण हा खूपच भयानक आहे. व्हिडीओ दुसरा तरुण मारत असला तरी तुम्हीच उंचावरून कोसळत आहात की काय असंच तुम्हाला वाटेल. तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल.
व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एका तरुणाचे पाय दिसतात. तरुण एका उंच ठिकाणी उभा दिसतो आहे. त्यानंतर तो तरुण खाली उडी मारतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो उड्या मारत जातो. तो ज्या ठिकाणी उड्या मारतो त्या जागाही इतक्या खतरनाक आहे, की थोडा जरी पाय घसरला तरी तरुण खाली कोसळण्याची भीती आहे आणि तो इतक्या उंचावर आहे की पडल्यानंतर त्याची वाचण्याची शक्यताही कमीच आहे.
हे वाचा - OMG! साडीत हे कसं शक्य आहे? तरुणीचा VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही
त्यातही शॉकिंग म्हणजे तरुणाने कॅमेरा आपल्यासोबत ठेवला आहे. त्याच्या पावलांकडे हा कॅमेरा आहे. ज्यामुळे तो जिथंजिथं उड्या मारतो ते सर्वकाही दिसतं. किंबहुना त्याला उडी मारताना पाहताना आपणच उडी मारत आहोत की काय, असंच वाटतं.
View this post on Instagram
पार्कर ट्राइब नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कबुतरासारखी लाइफस्टाइल असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहेत.
हे वाचा - 13,500 फूट उंचावरून तरुणीने मारली उडी; ऐनवेळी पॅराशूटच उघडलं नाही अखेर...
हा स्टंट प्रोफेशनल अॅथलिटमार्फत करण्यात आल्याचंही या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा स्टंट पाहून तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न करून नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Stunt video, Viral, Viral videos