मराठी बातम्या /बातम्या /Viral /स्वतःला पेटवून तरुणाने बिल्डिंगवरून मारली उडी; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

स्वतःला पेटवून तरुणाने बिल्डिंगवरून मारली उडी; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

आधी स्वतःला पेटवलं, नंतर बिल्डिंगवरून उडी मारली. तरुणाने असं भयंकर पाऊल उचलण्यामागे धक्कादायक कारण.

आधी स्वतःला पेटवलं, नंतर बिल्डिंगवरून उडी मारली. तरुणाने असं भयंकर पाऊल उचलण्यामागे धक्कादायक कारण.

आधी स्वतःला पेटवलं, नंतर बिल्डिंगवरून उडी मारली. तरुणाने असं भयंकर पाऊल उचलण्यामागे धक्कादायक कारण.

मुंबई, 31 मार्च : कुणी स्वतःला पेटवून घेतलं, कुणी बिल्डिंगवरून उडी मारली, अशा बातम्या कधी ना कधी आपल्या कानावर पडत असतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका तरुणाने आधी स्वतःला आग लावली त्यानंतर बिल्डिंगवरून उडी मारली. हे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे (Man fire himself and jumped from building room).

स्वतःला पेटवून बिल्डिंगवरून उडी मारणाऱ्या या तरुणाने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याला पाहूनच धडकी भरते. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला आगीने विळखा घातलेला हा तरुण दिसतो. त्याच्या संपूर्ण शरीराला आगीचा विळखा आहे. तो एका बिल्डिंगच्या छतावर उभा आहे.

आपल्याला काही कळायच्या आताच तो पेटत्या शरीरासह बिल्डिंगवरून उडी मारतो. तेव्हा काळजाचा अक्षरशः ठोकाच चुकतो. आता इतकं भयंकर पाऊल उचलण्यामागे नेमकं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तरुणाने असं जीवघेणं पाऊल उचलण्यामागील कारण संतापजनक आहे.

हे वाचा - कसं शक्य आहे? धगधगत्या मेटल लिक्विडमध्ये हात टाकूनही काहीच झालं नाही; VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

व्हिडीओच्या शेवटी तुम्ही पाहाल तरुणाने उडी मारल्यानंतर तो खाली पडतो पण थेट जमिनीवर नव्हे. तर खाली त्याच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली. तो एका मोठ्या फोमच्या गादीवर पडतो. ज्यामुळे त्याला लागत नाही आणि त्याच्या शरीरावरील आगही विझते. खाली काही लोकही उभे असलेले दिसत आहेत. पण तेसुद्धा असं काहीतरी पाहून पॅनिक झालेले नाहीत. तर अगदी शांत उभे आहेत.

View this post on Instagram

A post shared by Teddy Ponceau (@tedponceau)

एकंदर व्हिडीओ पाहता हा स्टंट असल्याचं समजतं. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी. व्हिडीओ बनवण्यासाठी हल्ली लोक काहीही करतात. अशा जीवघेण्या स्टंटचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात. या तरुणाने एकाच वेळी दोन खतरनाक स्टंट केले. एक म्हणजे त्याने शरीराला आग लावली आणि दुसरं म्हणजे या पेटत्या शरीरासहच त्याने इमारतीवरून उडी मारली.

हे वाचा - बापरे! हत्तीने तरुणाला सोंडेत धरून हवेत भिरकावलं; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

असे स्टंट करताना स्टंटबाज त्यांना दुखापत होणार नाही, हानी पोहोचणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात. त्यामुळे अशा स्टंटना भुलून तुम्ही मात्र असे स्टंट चुकूनही करू नका.

First published:

Tags: Fire, Shocking video viral, Stunt video, Viral, Viral videos