सिडनी, 27 मे : आपली जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर असेल, तिची आठवण आली, त्यांना पाहावंसं वाटलं किंवा त्यांना काहीतरी दाखवायचं असेल तर आपण थेट व्हिडीओ कॉल करतो. अशाच एका व्यक्तीनेही आपल्या पालकांना व्हिडीओ कॉल केला आणि त्याच्य काही सेकंदातच त्याने विमानातून उडी मारली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
(Man video call to parents during jumped from airplane).
रोजर रयान (Roger Ryan) असं व्यक्तीचं नाव आहे. रोजर मूळचा आयर्लंडमध्ये राहणारा आहे. ऑस्ट्रेलियात तो विमान प्रवास करत होता. विमानात बसताच त्याने आपल्या पालकांना स्काइपवर व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर त्याने त्यांच्या डोळ्यादेखत विमानातून उडी मारली. तेव्हा तो तब्बल 14 हजार फूट उंचावर होता. उडी मारल्यानंतरही त्याने आपला व्हिडीओ कॉल चालूच ठेवला होता. लेकाचं असं खतरनाक कृत्य पाहून त्याचे आईवडिल शॉक झाले.
व्हिडीओत पाहू शकता, रॉजर काही मित्रमैत्रिणींसोबत विमानात बसलेला दिसतो आणि आईवडिलांना व्हिडीओ कॉल करतो. आपला मुलगा कुठे आहे हे त्यांना आधी माहिती नव्हतं. सुरुवातीला त्यांना तो बसमध्ये असल्याचं वाटतं. पण कॉल करताच तो काही क्षण आपल्या पालकांना थांबवतो आणि विमानातून खाली उडी मारतो. लेकाला विमानातून उडी मारताना पाहून त्याचे पालकही हैराण होतात. त्याच क्षणी आपल्याही काळजाचा ठोका चुकतो.
हे वाचा - VIDEO - फक्त सफरचंदांना बोट लावून हिरो बनले आजोबा; झाला World Record
आता रोजरने विमानातून उडी त्याने उचललं कोणतं टोकाचं पाऊल नाही तर तो स्कायडायव्हिंग करतो आहे. त्याचे प्रशिक्षकही त्याच्यासोबत दिसत आहे. विमानातून उडी मारल्यानंतर तो पॅराशूटच्या मदतीने हवेत उडतो आहे. लेकाला असं हवेत उडताना पाहून त्याच्या पालकांना आश्चर्याचा धक्का बसतो. ते मोठमोठ्याने ओरडतात. त्यांचा चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहही पाहण्यासारखा आहे.
हॉस्टलवर्ल्ड युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 2015 सालातील आहे. पण आता तो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हे वाचा - VIDEO - इवल्याशा उंदरावर तुटून पडला श्वानांचा कळप; शेवटपर्यंत एकट्याने लढा दिला अखेर...
चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील आहे. मूळचा आयर्लंडचा असलेल्या रोजरने 14 हजार फूट उंचावरून स्कायडायव्हिंग केलं आहे. प्रवासावेळी आपण आपल्या पालकांशी फोनवर बोलतो, हे सामान्य आहे. पण आपल्या या अशा प्रवासात त्यांच्याशी बोलण्याचा निर्णय रोजरने घेतला. विमानात बसल्यानंतर त्याने आपले आईवडील आणि मुलाला फोन केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.