• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • नवव्या मजल्यावरून उडी घेतली अन् थेट BMW वर कोसळला युवक; अवस्था पाहून सगळेच हादरले

नवव्या मजल्यावरून उडी घेतली अन् थेट BMW वर कोसळला युवक; अवस्था पाहून सगळेच हादरले

हा व्यक्ती खाली उभा असलेल्या BMW कारवर कोसळला (Man fall Down on BMW Car) . यानंतर कार आणि या व्यक्तीची जी अवस्था झाली ती पाहून सगळेच हैराण झाले.

 • Share this:
  नवी दिल्ली 09 ऑक्टोबर : अनेकदा अडचणीच्या वेळी नैराश्यात जाऊन माणून असे निर्णय घेतो, जे अत्यंत धोकादायक असतात. आत्महत्येचा (Suicide) निर्णय यातीलच एक आहे. मात्र, आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा फसतोही. न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबतही असंच झालं. या व्यक्तीनं आत्महत्या करण्यासाठी नवव्या मजल्यावरुन उडी घेतली (Man Jumped From 9th Floor). मात्र, मृत्यूनंच त्याला दगा दिला. हा व्यक्ती खाली उभा असलेल्या BMW कारवर कोसळला (Man fall Down on BMW Car) . यानंतर कार आणि या व्यक्तीची जी अवस्था झाली ती पाहून सगळेच हैराण झाले. 70 किलोचा केळीचा घड मालकालाच पडला महागात, यामुळे कामगाराला द्यावे लागणार 4 कोटी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलं, की इतक्या उंचीवरून खाली कोसळूनही हा व्यक्ती जिवंत होता. सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे हा व्यक्ती खाली उभा असलेल्या कारवर कोसळला. त्याला भरपूर मार लागला मात्र तरीही तो शुद्धीवर होता आणि त्यानं खाली उभा असलेल्या लोकांसोबत बोलायला सुरुवात केली. सगळ्यात आधी त्यानं विचारलं, की काय झालं? यानंतर लोकांनी त्याला सांगितलं की तो नवव्या मजल्यावरुन कोसळला आहे. वेदनेनं हैराण हा व्यक्ती कारमधून खाली उतरला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला गंभीर दुखापत झाली आहे. अमेरिकेत घडलेल्या या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्यक्तीनं आपली ओळख लपवली आहे. मात्र, त्याचं वय ३१ वर्ष असल्याचं समोर आलं आहे. त्यानं एखाद्या फिल्मी सीनप्रमाणे नवव्या मजल्यावरुन उडी घेतली. मात्र, तो खाली उभा असलेल्या बीएमडब्ल्यू कारवर कोसळला. इतक्या उंचावरुन पडल्यामुळे त्याला दुखापत झाली. सोबतच कारची अवस्थाही वाईट झाली. कारचं छत पूर्णपणे तुटलं. सोबतच खिडक्या आणि समोरची काचही फुटली. हा व्यक्ती कारच्या तुटलेल्या छतात वाईट पद्धतीनं अडकला. मुलाच्या एका चुकीमुळे पालटलं पित्याचं नशीब; रातोरात झाला 7 कोटी 50 लाखाचा मालक घटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीनं न्यूयॉर्क पोस्टला सांगितलं, की अचानक त्यांनी जोराचा आवाज ऐकला. आधी तर हेच समजलं नाही की वरून काय पडलं आहे. मात्र, काहीच वेळात ओरडल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती कारवरती कोसळला होता. त्याला भरपूर दुखापत झाली होती. यानंतर कोणीतरी रुग्णवाहिका आणि पोलिसांना माहिती दिली. हा व्यक्ती खाली कोसळल्यानंतरही लोकांसोबत बोलत होता. सध्या या कारच्या मालकाबद्दल काही माहिती मिळालेली नाही. मात्र, आपल्या गाडीची झालेली अवस्था पाहून त्यालाही नक्कीच धक्का बसेल.
  Published by:Kiran Pharate
  First published: