— The Darwin Awards (@AwardsDarwin_) May 26, 2022सोफ्यात इतका भयंकर ब्लास्ट झाला की आवाज ऐकून बॉम्बच फुटला असावा असं वाटलं. पण तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तर सोफ्यात झालेला हा ब्लास्ट हवेचा आहे. म्हणजे सोफ्यातील कुशनमध्ये भरलेली हवा वेगाने बाहेर आल्याने हा स्फोट झाला. @AwardsDarwin_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. व्यक्तीला काही झालं नाही, हे पाहून सर्वांच्या जीवात जीव आला. काहींना हा व्हिडीओ पाहून हसूही आलं आहे. त्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. हे वाचा - सांडपाण्याच्या 20 फूट खोल नाल्यात कोसळला चिमुकला; बचावासाठी आईनेही घेतली उडी अन्.., VIDEO याआधीही असाच एक व्हिडीओ समोर आला होता. अशाच सोफ्यावर बसलेल्या एका तरुणाच्या खाली ब्लास्ट होतो आणि तो उडतोच. त्यावेळी तो घाबरतो पण त्याच्यासोबत असलेले त्याचे इतर मित्र मात्र जोरजोरात हसू लागतात.
hepgul5 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. व्हिडीओ पाहून सुरुवातीला आपल्यालाही धडकी भरते पण नंतर मात्र त्याच्या मित्रांनी त्याच्यासोबत केलेली ही एक मस्करी असल्याचं समजतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Viral, Viral videos