नवी दिल्ली, 27 जानेवारी : आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी बॉसची म्हणा किंवा आपल्या सहकाऱ्यांशी थोडी बाचाबाची होतच राहते. कामवरुन कधी मत एकमेकांशी सहमत होत नाहीत तर किंवा कशावरुन. सारख्या सारख्या होणाऱ्या मतभेदांमुळे जेव्हा कर्मचारी त्याच्या बॉसला कंटाळलेला असतो, तेव्हा तो रागाच्या भरात काय करेल किंवा काय करु शकतो याचा काही नेम नाही. अशीच काहीशी घटना सध्या समोर आली आहे. बॉसशी भांडण झाल्यामुळे एका कर्मचाऱ्याने काय केलं असेल याचा तुम्ही विचारही करु शकत नाही.
एक व्यक्तीचे बॉससोबत सुट्टीच्या पगारावरुन भांडण झालं. या वादामुळे कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये काय केलं याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल. हे ऐकून तुम्हालाही थक्का बसल्याशिवाय राहणार नाही. यूकेच्या एका शेफने त्याच्या बॉसच्या सुट्टीच्या पगारावरून वाद सोडवण्याचा विचित्र मार्ग निवडला. टॉम विल्यम्स म्हणून ओळखल्या जाणार्या या व्यक्तीने बॉसशी भांडण झाल्यानंतर किचनमध्ये 20 झुरळे सोडली. या घटनेमुळे सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - रुसलेल्या बॉयफ्रेंडसाठी मुलीनं लिहिलं हटके लव्ह लेटर, हसून हसून व्हाल लोटपोट
टॉम विल्यम्स म्हणून ओळखला जाणार्या व्यक्ती लिंकनशायरमधील ब्रेफोर्ड पूल या काउंटी शहरातील रॉयल विल्यम फोर्थ बारच्या किचनमध्ये शेफचं काम करायचा. परंतु त्याच्या बॉसशी भांडण झाल्यानंतर त्याने 20 झुरळे आणली आणि त्यांच्या किचनंध्ये सोडली. रजेच्या पगारावरून झालेल्या वादातून ही घटना घडली होती. लिंकन क्राउन कोर्टात सादर केलेल्या पुराव्यानुसार, 25 वर्षीय व्यक्तीवर बारच्या किचनमध्ये झुरळांना सोडल्याचा आरोप होता. 20 झुरळे सोडल्याबद्दल या शेफला 17 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
दरम्यान, शेफचा सुट्टीचा पगार अंदाजे रु. 10,000 कट करण्यात आला होता. दोन दिवसांनंतर, निराश शेफ बारमध्ये परतला आणि एका भांड्यातून 20 झुरळे बारच्या किचनमध्ये सोडली. सदस्यांना पेस्ट कंट्रोलला कॉल करून जागा पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी बार बंद करावा लागला. शेफला न्यायाधीशांनी सतरा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याशिवाय, त्याला एकूण 200 तासांची न चुकता सामुदायिक सेवा करावी लागेल. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. अनेकांनजण या घटनेमुळे थक्क झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Shocking news, Viral, Viral news